Realme 9 Pro+ 5G : रियलमीची शानदार ऑफर! ‘या’ 5G फोनवर मिळत आहे फ्री गिफ्टसह हजारो रुपयांची सवलत, त्वरा करा

Published on -

Realme 9 Pro+ 5G : काही दिवसांपूर्वी Realme ने आपला Realme 9 Pro+ हा शानदार 5G फोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये इतकी आहे. परंतु आता तुम्ही बंपर डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर अनेक ऑफर देत आहे.

त्यामुळे तुम्हाला हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करता येईल. इतकंच नाही तर कंपनी या फोनसोबत 999 रुपये किंमतीचा कूलिंग कूलर देखील देत आहे. परंतु तुम्हाला या सवलतीचा लाभ लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. कारण ही ऑफर फक्त 31 जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे.

जाणून घ्या Realme 9 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्टोरेजचा विचार केला तर Realme च्या या फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजदिले आहे. कंपनी प्रोसेसर म्हणून, यात आर्म माली- जी68  एमसी4 जीपीयूसह मीडियाटेक डायमेंसिटी 920 5G चिपसेट दिला आहे. या 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील दिला आहे.

वापरकर्त्यांसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. या फोनमध्ये 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा पाहायला मिळेल. फोनमध्ये दिलेली बॅटरी 4500mAh ची आहे. ही बॅटरी 60W सुपरडार्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

तर OS बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करेल. तर गेमिंग दरम्यान फोन गरम होण्यापासून रोखण्यासाठी त्यात व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिली आहे. शक्तिशाली आवाजासाठी, तुम्हाला फोनमध्ये Dolby Atmos ड्युअल स्टीरिओ स्पीकर सिस्टम मिळेल. हा फोन तुम्हाला सनराईज ब्लू, अरोरा आणि मिडनाईट ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe