Realme GT 7 Pro 5G:- हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर काही आठवड्यांतच मोठ्या किंमत कपातीसह उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन गेमिंग आणि उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट, 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे.
किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आता हा फोन अधिक किफायतशीर आणि आकर्षक पर्याय बनला आहे. फ्लिपकार्ट आणि अधिकृत ई-स्टोअरवर या फोनच्या किंमतीत बदल झाला असून ग्राहकांसाठी हा एक उत्तम संधी आहे.
नवीन किंमत आणि ऑफर्स
Realme GT 7 Pro 5G च्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. पूर्वी 65,999 रुपयांना मिळणारा टॉप व्हेरिएंट आता 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर बेस व्हेरिएंट 54,999 रुपयांमध्ये मिळतो. याशिवाय कंपनी अतिरिक्त 2,250 रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काउंटही देत आहे.ज्यामुळे हा फोन आणखी परवडणारा ठरतो.
दमदार डिस्प्ले
Realme GT 7 Pro 5G मध्ये 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेमध्ये अधिक स्पष्टता आणि रंगांची अचूकता मिळते. जी गेमिंग आणि मल्टिमीडियासाठी उपयुक्त ठरते. त्याच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिला असून जो स्क्रॅच आणि धक्क्यांपासून बचाव करतो.
कसा आहे प्रोसेसर आणि परफॉर्मन्स?
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे.जो उच्च गती आणि कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. यासोबत 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळते.ज्यामुळे हा फोन सुपरफास्ट स्पीड देतो. अँड्रॉइड 15 आधारित Realme UI सॉफ्टवेअरमुळे युजर इंटरफेस अधिक सहज आणि आकर्षक झाला आहे.
कसा आहे कॅमेरा सेटअप?
फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 50MP प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. जो अधिक स्थिर आणि स्पष्ट फोटो घेतो. तसेच 50MP टेलिफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे, जो उत्कृष्ट गुणवत्ता प्रदान करतो.
बॅटरी आणि चार्जिंग
या स्मार्टफोनमध्ये 6,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे.जी दीर्घकाळ टिकणाऱ्या परफॉर्मन्ससाठी उपयुक्त ठरते. यासोबत 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. ज्यामुळे फोन काही मिनिटांतच पूर्ण चार्ज होतो. त्यामुळे हा फोन जास्त वापरणाऱ्या युजर्ससाठी उत्तम पर्याय ठरतो.
विशेषता आणि टिकाऊपणा
Realme GT 7 Pro ला IP69 रेटिंग मिळाली आहे.जी वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ संरक्षण प्रदान करते. हे डिव्हाइस कठीण परिस्थितींमध्येही उत्तम प्रकारे काम करू शकते. याच्या दमदार प्रोसेसर, उत्कृष्ट डिस्प्ले, प्रीमियम कॅमेरा सेटअप आणि मजबूत बॅटरीमुळे हा फोन गेमर्स आणि टेकप्रेमींसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.