Realme Smart TV : तुम्ही देखील तुमच्यासाठी स्वस्तात मस्त नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अवघ्या 2,849 रुपयांमध्ये बाजारात धुमाकूळ घालणार स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये Realme आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. Realme ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये दमदार फीचर्ससह येणाऱ्या स्मार्ट टीव्ही ऑफर करत असतो . यातच आता कंपनीने 32 इंचाचा स्मार्ट टीव्हीवर ऑफर जाहीर केली आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही 2,849 रुपयांमध्ये नवीन Realme Smart TV खरेदी करू शकतात.
किंमत आणि ऑफर
Realme च्या 32 इंच स्मार्ट टीव्हीची MRP 23,999 रुपये आहे. जे फ्लिपकार्टवर 31 टक्के डिस्काउंटनंतर 16,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 13,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, स्मार्ट टीव्हीची किंमत रु. 2,849 आहे.
SBI क्रेडिट कार्ट वरून टीव्ही खरेदीवर 10% सूट दिली जात आहे. तसेच, 1000 रुपयांच्या ईएमआयवर टीव्ही खरेदी करता येईल. याशिवाय Flipkart Axis Bang कार्डवर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. टीव्हीच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तसेच, टीव्ही पॅनलवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. टीव्ही खरेदीवर 7 दिवस बदलण्याची सुविधा दिली जात आहे. म्हणजे जर टीव्ही आवडत नसेल तर तो 10 दिवसांत परत करता येईल.
तपशील
Realme 32 इंच टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney Hotstar, YouTube चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट सपोर्टसह टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1080 x1920 पिक्सेल आहे. टीव्हीमध्ये 24W साउंड आउटपुट आहे. तसेच 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.