Realme Smartphone : Realme ने भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. इतर कंपन्यांना कडवी टक्कर देण्यासाठी कंपनीने आपला नवा स्मार्टफोन Realme P4 Power 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे तब्बल 10,001mAh क्षमतेची सिलिकॉन कार्बन ‘टाइटन बॅटरी’, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल 39 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
Realme P4 Power 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, Realme ची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची पहिली विक्री 5 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.

ग्राहकांना हा फोन ट्रान्ससिल्व्हर, ट्रान्सऑरेंज आणि ट्रान्सब्लू अशा तीन आकर्षक रंगांमध्ये मिळणार आहे. फोनमध्ये आधुनिक ट्रान्सव्यू डिझाईन देण्यात आले असून, LED फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
किंमतीबाबत बोलायचं झालं, तर 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये, तर 12GB + 256GB टॉप व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय, ग्राहकांना खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट देखील मिळणार आहे.
स्पेसिफिकेशन्सकडे पाहिले तर, या फोनमध्ये 6.8 इंचाचा 1.5K 4D Curve+ HyperGlow डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 6,500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. फोन Android 16 आधारित Realme UI 7.0 वर चालतो. कंपनीने या डिव्हाईससाठी 3 वर्षांचे OS अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याची हमी दिली आहे.
परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra (4nm) प्रोसेसर देण्यात आला असून, यासोबत HyperVision+ AI चिप देखील आहे. हा चिपसेट 300% अधिक चांगले रिझोल्यूशन आणि 400% स्मूथ फ्रेम रेट देतो, असा दावा करण्यात आला आहे. फोनला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले असून, त्यामुळे तो धूळ व पाण्यापासून सुरक्षित राहतो.
कॅमेरा विभागात, फोनमध्ये 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. मोठ्या बॅटरीमुळे हा फोन 32.5 तास व्हिडिओ प्लेबॅक, 185.7 तास म्युझिक प्लेबॅक आणि 11.7 तास गेमिंग अनुभव देऊ शकतो.
एकूणच, जबरदस्त बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्समुळे Realme P4 Power 5G हा स्मार्टफोन मिड-प्रिमियम सेगमेंटमध्ये मोठी चर्चा निर्माण करणार, हे निश्चित आहे.













