Realme Smartphones Discount : रियलमीच्या ‘या’ नवीन फोनवर मिळत आहे जबरदस्त सूट, बघा कुठे आहे ऑफर…

Ahmednagarlive24 office
Published:
Realme Smartphones Discount

Realme Smartphones Discount : जर तुम्ही सध्या मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर रियलमी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन येत आहे. सध्या रियलमी आपल्या एका फोनवर मोठा डिस्काऊंट ऑफर करत आहे. कंपनी कोणत्या मोबाईलवर ही ऑफर देत आहे, बघा…

नुकताच लॉन्च केलेला फोन Realme 12 5G खरेदीवर ऑफर मिळत आहे. तुम्ही हा फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे.

फ्लिपकार्टवर सध्या अपग्रेड डेज सेल सुरू आहे जिथे तुम्ही एक प्रीमियम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. चला आपण प्रथम Realme 12 5G फोनची किंमती, फीचर्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया…

फोनच्या किंमती आणि ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, Realme च्या या हँडसेटची किंमत 23,999 रुपये आहे. जो तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून 19,999 रुपयांना 16 टक्केच्या सूटवर खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 4,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता.

याशिवाय, तुम्हाला बँक ऑफरद्वारे फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील देत आहे. याशिवाय, तुम्हाला Flipkart UPI पेमेंट करण्यावर 25 टक्के सूट देखील मिळेल. ही विक्री मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्याचा लाभ घ्या, अन्यथा तुमच्या हातातून ही संधी जाईल.

Realme 12 5G वैशिष्ट्ये :-

-यामध्ये तुम्हाला 8 GB व्हर्च्युअल रॅम मिळेल म्हणजेच एकूण रॅम 16 GB आहे.

-यामध्ये तुमच्या ग्राहकांना प्रोसेसरसाठी MediaTek Dimension 7050 चा चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे.

-फोटोग्राफीसाठी, तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो 50MP प्राइमरी कॅमेरा सह येतो. दुसरा कॅमेरा 8MP सह उपलब्ध आहे आणि तिसरा कॅमेरा 2MP सह उपलब्ध आहे.

-तसेच, सेल्फी क्लिक करण्यासाठी यात 16 एमपी फेसिंग कॅमेरा आहे.

-यामध्ये तुम्हाला AMOLED पॅनल डिस्प्ले मिळेल, जो 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.

-या फोनमध्ये तुम्हाला 5,000 mAh ची शक्तिशाली बॅटरी मिळेल. जी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. म्हणजेच हा फोन काही वेळातच चार्ज होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe