Best Realme Smartphones : कंपनीने भारतापूर्वी इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये नुकताच Realme 12 5G आपला नवीन फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर चिपसेट आहे. तसेच यात 6.67 इंचाची फुल एचडी प्लस OLED स्क्रीन आहे. जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. यात ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. तसेच हा फोन Android 14 सह येतो. हा फोन भारतात 6 मार्चला लॉन्च होणार आहे. त्याची किंमत आणि फीचर्स काय असतील जाणून घेऊया.
Realme 12 5G किंमत
Realme 12 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन इंडोनेशियामध्ये 8GB 256GB कॉन्फिगरेशनमध्ये IDR 41,99,000 (अंदाजे 22,200 रुपये) मध्ये येतो. मलेशियामध्ये, फोन 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज MYR 1,499 (अंदाजे 26,200) सह येतो. हा फोन दोन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
Realme 12 5G स्पेसिफिकेशन्स
Realme 12 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच FHD (2,400 x 1,080 पिक्सेल) OLED डिस्प्ले आहे. फोनची पीक ब्राइटनेस 2000 nits आहे. हा फोन रेनवॉटर स्मार्ट टचसह येते जो पावसातही डिस्प्ले टचला सपोर्ट करतो. म्हणजे तुम्ही ओल्या हातानेही फोन वापरू शकता.
फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 SoC आहे ज्यामध्ये 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. हा फोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहेत. यामध्ये प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेल Sony LYT-600 लेन्स आहे. त्याला OIS सपोर्ट आहे. यासोबतच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी AI फ्रंट कॅमेरा आहे जो 16 मेगापिक्सेल आहे.
या Realme फोनची बॅटरी क्षमता 5000 mAh आहे ज्यामध्ये 67W SuperVOOC चार्जिंग प्रदान केले आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, GPS, Glonass, Beidou, Galileo, QZSS, Wi-Fi, Bluetooth 5.2 आणि USB Type-C प्रदान केले आहेत.