Jio recharge plan : रिलायन्स जिओ सिमचा वापर देशात सर्वाधिक केला जातो. कंपनीचे परवडणारे रिचार्ज प्लॅन, कनेक्टीव्हीटी आणि कंपनीकडून देत मिळणारे फायदे, हे त्याचे सर्वात कारण आहे. सध्या देशभरात 46 कोटींहून अधिक लोक जिओ सिम वापरतात. एवढ्या मोठ्या यूझर्स वर्गामुळे, कंपनी लोकांच्या गरजांची देखील चांगली काळजी घेते. हेच कारण आहे की, कंपनी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते.
सोयीनुसार मिळतात प्लॅन
ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. अलिकडच्या काळात जिओने ग्राहकांना वारंवार मासिक प्लॅन घ्यावे लागू नयेत म्हणून दीर्घ व्हॅलिडिटीसह रिचार्ज प्लॅनची संख्या देखील वाढवली आहे. जिओने त्यांच्या यादीत असा एक अद्भुत रिचार्ज प्लॅन जोडला आहे ज्याची किंमत खूप कमी आहे आणि व्हॅलिडिटी देखील खूप जास्त आहे.

Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन
रिलायन्स जिओने 1748 रुपयांचा एक प्लॅन काही दिवसांपूर्वी लाँन्च केला. जिओने सामान्य ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडला. जर तुम्हाला दीर्घकाळ रिचार्जच्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल, तर हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे. या प्लॅनमध्ये जिओ आपल्या ग्राहकांना 11 महिने म्हणजेच 336 दिवसांची दीर्घ व्हॅलिडिटी देत आहे.
या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. म्हणजेच एका रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही वर्षासाठी सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा अनुभवता. फ्री कॉलिंगसोबतच जिओ ग्राहकांना फ्री एसएमएसची सुविधा देखील मिळते.
जीओ टिव्हीही पाहता येणार
या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ आपल्या कोट्यावधी ग्राहकांना काही अतिरिक्त फायदे देणार आहे. तुम्हाला टीव्ही चॅनेल पाहण्याची आवड असेल, तर या जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्हीचे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. त्याच्या मदतीने तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला योजनेत 50GB एआय क्लाउडचे फ्री सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.