Redmi Note 12T Pro 5G : रेडमीने आपला एक शक्तिशाली स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्यावर कंपनी अनेक दिवसांपासून काम करत होती. परंतु जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे कारण हा फोन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे.
लवकरच हा फोन कंपनी इतर बाजारपेठेत लाँच करणार आहे. कंपनी यात 64MP कॅमेरा आणि 5080mAh बॅटरी देऊ शकते. जी 67W चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्ही हा फोन कार्बन ब्लॅक, आइस फॉग व्हाइट आणि ब्लू रंगात खरेदी करू शकता.

हा फोन MediaTek Dimensity 8200 Ultra प्रोसेसरवर काम करेल. कंपनीकडून त्यात व्हीसी लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन MediaTek Dimensity 8200 Ultra प्रोसेसरवर काम करतो. कंपनीकडून त्यात व्हीसी लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च केला आहे. कंपनी लवकरच याला इतर मार्केटमध्येही लॉन्च करेल.
जाणून घ्या किंमत
या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1599 युआन (सुमारे 19 हजार रुपये) इतकी आहे. ही किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची असणार आहे. Note 12T Pro चे 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट 1699 युआन (सुमारे 20 हजार रुपये) इतकी आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1799 युआन (सुमारे 21 हजार रुपये) इतकी आहे.
तसेच कंपनीच्या 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1999 युआन (सुमारे 23,300 रुपये) इतकी आहे. हा फोन तीन रंगात लॉन्च केला आहे. हा फोन कार्बन ब्लॅक, आइस फॉग व्हाइट आणि ब्लूमध्ये खरेदी करू शकता. सध्या ते चीनमध्ये उपलब्ध असून आगामी काळात कंपनी तो भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये रीब्रँड करू शकते.
फीचर्स
यामध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन MediaTek Dimensity 8200 Ultra प्रोसेसरसह येतो. VC लिक्विड कूलिंग फीचर यात दिले आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येत असून ज्याची मुख्य लेन्स 64MP आहे.
इतकेच नाही तर यात 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध असणार आहे. फ्रंटमध्ये कंपनीकडून 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 12GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. यात 5080mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W चार्जिंगला सपोर्ट करते.