Redmi Note 14 5G | भारतीय ग्राहकांमध्ये Redmi Note सिरीजची लोकप्रियता ओळखून Xiaomi ने आपल्या नवीन Redmi Note 14 5G वर खास सवलतीचा लाभ देत ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. सध्या Amazon वर या फोनसाठी भक्कम ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्या अंतर्गत हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो. हा फोन फीचर्सच्या बाबतीत सुद्धा दमदार ठरत आहे.
Redmi Note 14 5G वरील सूट-
हा डिव्हाइस सध्या Amazon वर ₹20,998 किमतीला लिस्ट केला आहे. मात्र निवडक बँक कार्ड्सवर 1,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत असून त्यानंतर फोनची किंमत ₹20,000 पेक्षा कमी होते. याशिवाय, ग्राहक जुना फोन एक्सचेंज करून ₹18,400 पर्यंत अतिरिक्त सूट मिळवू शकतात. म्हणजेच हा फोन अतिशय कमी किमतीत मिळू शकतो.

फीचर्स-
या फोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2100 निट्स ब्राइटनेससह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर असून 6GB/8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.
यामध्ये 50MP + 8MP + 2MP रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 20MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याशिवाय, 5110mAh ची दमदार बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्टदेखील दिला आहे. HyperOS, IP64 रेटिंग आणि Gorilla Glass 5 सारख्या फीचर्समुळे हा फोन आणखीच मजबुत ठरतो.
हा फोन तुम्हाला टायटन ब्लॅक, मिस्टिक व्हाइट आणि फँटम पर्पल या रंगांमध्ये मिळेल. जर तुम्ही उत्तम फीचर्ससह 5G फोन स्वस्तात खरेदी करू इच्छित असाल, तर Redmi Note 14 5G हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.