Redmi Smart TV : आता जर तुम्हाला स्वस्तात तुमच्या घरात मोठ्या इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही 55 इंचाच्या मोठ्या स्क्रीनचा टीव्ही मॉडल तुम्ही मोठ्या सवलतीत घरी नेऊ शकता.
55 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही तुम्ही 26 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. Redmi च्या टीव्हीवर अशी ऑफर मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या टीव्हीमध्ये कमी किंमतीत जबरदस्त आणि फीचर्स मिळत आहेत.

समजा तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स आणि स्क्रीनसह स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर आता तुम्ही Redmi 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करू शकता. फ्रीडम सेलमधून तुम्ही या रेडमी स्मार्ट टीव्हीवर 26,000 रुपयांपेक्षा जास्त सवलत मिळवू शकता. जाणून घेऊयात संपूर्ण ऑफर्स.
26000 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत न्या घरी
किमतीचा विचार केला तर कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही अॅमेझॉन सेलमध्ये 40% सवलतीमध्ये खरेदी करता येईल. त्यानंतर तुम्हाला कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही 32,999 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 54,999 रुपये इतकी आहे. इतकेच नाही तर जर तुम्ही SBI बँकेच्या क्रेडिटने हा टीव्ही खरेदी केला तर तुम्हाला यावर एकूण 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
इतकेच नाही तर तुम्हाला एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेता येईल. तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीची देवाणघेवाण केली तर तुम्हाला 2,550 रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज डिस्काउंटही मिळेल. म्हणजेच या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला एकूण 26,000 रुपयांपेक्षा जास्त सवलत मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीच्या बदल्यात जास्त सवलतींचा लाभ घेऊ शकता. हे लक्षात घ्या की या स्मार्टटीव्हीला युजर रेटिंग 5 पैकी 4 स्टार मिळाले आहेत.
जाणून घ्या फीचर्स
फीचर्सचा विचार केला तर हा रेडमीचा स्मार्ट टीव्ही व्हॉईस कमांडद्वारे नियंत्रित करता येईल. तर त्यावर नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, सोनीलिव्ह आणि हॉटस्टारचा आनंदही घेता येईल. कंपनीच्या या स्मार्टटीव्हीमध्ये 20W ध्वनी, 3840×2160 रिझोल्यूशन आणि सर्व OTT प्लॅटफॉर्मसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.