Redmi Smartphone : बजेट मोबाईलमध्ये आणखी एका फोनची एंट्री होणार आहे, स्पर्धेने भरलेल्या मोबाईल उद्योगात रेडमी आपला बजेट फोन लवकरच सादर करणार आहे. रेडमी हा फोन Redmi 11A या नावाने सादर करणार आहे, कंपनी हा फोन लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
हा हँडसेट सिंगापूरच्या IMDA डेटाबेसमध्ये मॉडेल क्रमांक 22120RN86G सह दिसला आहे. तर भारतात मॉडेल क्रमांक 22120RN86I आहे, तसेच चीन मध्ये याचा मॉडेल क्रमांक 22120RN86C आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असे स्पष्ट होत आहे की, चीन व्यतिरिक्त हा फोन भारतात तसेच जागतिक बाजारात लॉन्च होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी या स्मार्टफोनचे काही खास स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. चला, जाणून घेऊया…

Redmi 11A स्पेसिफिकेशन्स
आगामी Redmi 11A चे प्रमुख वैशिष्ट्य TENAA सूचीमध्ये उघड झाले आहे. लिस्टिंगनुसार, या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा IPS LCD डिस्प्ले उपलब्ध असेल. याचे रिझोल्यूशन 1650×720 पिक्सेल असेल. याशिवाय, डिवाइस 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो.
फोन अनेक रॅम पर्यायांमध्ये आणला जाऊ शकतो. यात 2GB, 4GB, 6GB आणि 8GB रॅम पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. स्टोरेजसाठी अनेक प्रकार देखील येतील. Redmi 11A 32GB, 64GB, 128GB आणि 256GB अंतर्गत स्टोरेजमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर स्टोरेज वाढवण्यासाठी फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
Redmi 11A बॅटरी
हा स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरीसह सुसज्ज असेल. फोनच्या चार्जिंग सपोर्टबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. Redmi चा हा आगामी फोन Android 12 OS किंवा Android 13 OS वर चालेल.
याशिवाय फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. तथापि, कंपनी भविष्यात लॉन्चिंगची तारीख आणि वैशिष्ट्ये लीक करू शकते.