UPI Tips : UPI पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, होणार नाही आर्थिक नुकसान…

Ahmednagarlive24 office
Published:
UPI Tips

UPI Tips : आज सर्व जग आधुनिकतेकडे (Digitization) झेप घेत आहे. अशातच सर्व व्यवहार अगदी ऑनलाईन होत आहेत. अगदी छोट्या-छोट्या वस्तूंसाठी लोक ऑनलाईन पैसे देताना दिसतात. ऑनलाईन पमेंटसाठी लोकं UPI चा मोठ्या प्रमाणात वापर करतात. फक्त भारतातच नाही तर UPI चा वापर जगभरात केला जातो.

वापर वाढल्यामुळे UPI पेमेंट करताना अनेकवेळा काही समस्यांचा समाना करावा लागतो. कधी कधी बँकेचे सर्व्हर डाउन किंवा कमकुवत इंटरनेटमुळे अनेक वेळा पेमेंट अडकून पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून पेमेंट करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीत.

-बऱ्याच वेळा दैनंदिन मर्यादा गाठल्यामुळे अनेक वेळा बँक पेमेंट होल्डवर ठेवतात. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे जन धन खाते असेल तर तुम्ही एका महिन्यात फक्त 6 UPI व्यवहार करू शकता. इतरांबद्दल बोलायचे तर या व्यतिरिक्त इतर खात्यांसाठी 1 लाख रुपये रोजची मर्यादा आहे. मर्यादा गाठल्यास तुमचे पेमेंट होल्डवर जाऊ शकते. अशास्थितीत तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे.

-बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तुम्हाला ही समस्या टाळायची असेल, तर तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक खाती लिंक करा. तुमचे एकच बँक खाते असेल आणि सर्व्हर डाऊन झाला तर तुम्ही काहीही करू शकत नाही. दोन खाती लिंक करण्याचा फायदा असा होईल की एका बँकेचा सर्व्हर डाऊन असेल तर दुसऱ्या बँकेतून पेमेंट करता येईल.

-अनेकवेळा आपण UPI पिन विसरतो. त्यामुळे आपण चुकीचा UPI पिन टाकतो. असे केल्याने तुमचे पेमेंट अडकू शकते किंवा अयशस्वी होऊ शकते. त्यामुळे असा UPI पिन वापरा जो तुम्हाला नीट लक्षात असेल. तुम्हाला तुमचा UPI पिन आठवत नसेल किंवा विसरला असेल, तर तो रीसेट करा.

-तुमचे UPI पेमेंट करण्यासाठी, इंटरनेट कनेक्शन असणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय पेमेंट करू शकत नाही. इंटरनेट कनेक्शनमध्ये काही समस्या असल्यास तुमचे पेमेंट थांबू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही फोनद्वारे पेमेंट करत असाल आणि नेट कमी असेल तर पेमेंट करू नका. अन्यथा तुमचे पेमेंट काही काळासाठी अडकू शकते.

-जर तुम्हाला जास्त पैसे भरण्याची गरज नसेल तर UPI Lite वापरणे उत्तम. UPI Lite वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला इंटरनेटची आवश्यकता नसते. तसेच बँकेच्या सर्व्हरमध्ये कोणतीही अडचण येत नाही. UPI Lite च्या माध्यमातून तुम्ही दररोज दोनदा 4,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe