Royal Enfield Bullet 350 EMI Calculation:- रॉयल एनफिल्ड बुलेट म्हटले म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुणाईमध्ये क्रेझ दिसून येते व याच रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ही बाईक उत्तम अशी बाईक असून तिचे डिझाईन पूर्वीच्या बाईक सारखेच आहे.
हे खूप मजबूत बाईक असून या बाईकची स्टील फ्रेम आणि टीयर ड्रॉप आकाराची इंधन टाकी या बाईकला खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षक बनवते व वेगळा लूक देते. तसेच या बाईकचे इंजिन केसिंग, हेड लॅम्प आणि एक्झॉस्ट पाईप या रॉयल एनफिल्ड 350 ला जुनी आणि क्लासिक शैली प्रदान करतात.
हे सगळे भाग बाईकला मजबूत बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ही बाईक आता आधुनिक वैशिष्ट्यांसह आली आहे. परंतु तिचा जुना क्लासिक लूक अजून देखील तसाच ठेवण्यात आला आहे.
कंपनीने या बाईकमध्ये एक साधी आणि उपयुक्त इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम दिली आहे व यामध्ये अनालॉग स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि फ्युएल गेज दिली आहे. या प्रकारची सगळी सिस्टम रायडरला आवश्यक माहिती सहजपणे प्रदर्शित करते.
तसेच या बाईकची संपूर्ण बिल्ड गुणवत्ता अतिशय मजबूत आहे व यामुळे ती शहरातील दैनंदिन वापरासाठी तसेच ऑफरोड रायडिंगकरिता योग्य अशी बाईक आहे. ही बाईक तिची डिझाईन आणि वैशिष्ट्ये इत्यादीमुळे सर्वत्र ठिकाणी चालवायला खूप उत्तम बाईक आहे.
कसे आहे रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे इंजिन?
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मध्ये 349 सीसी एअर कुल्ड सिंगल सिलेंडर J सिरीज इंजिन दिले आहे जे हंटर 350, मिटीओर 350 आणि क्लासिक 350 मध्ये देखील वापरले जाते.
तसेच इंजिन सोबत 5- स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच हे इंजिन 6100 rpm वर 20.4 पीएस पावर आणि ४००० आरपीएम वर 27nm टॉर्क जनरेट करते. यामुळे ही बाईक शक्तीशाली आणि प्रत्येक स्थितीमध्ये चालवण्यायोग्य बनते.
किती आहे या बाईकची किंमत?
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची किंमत अतिशय वाजवी असून तिची सुरुवातीची किंमत एक लाख 73 हजार पाचशे बासष्ट रुपये एक्स शोरूम इतकी आहे. मिड रेंज सेगमेंट मधील इतर बाईकच्या तुलनेत ही बाईक एक चांगला पर्याय आहे. या किमतीत बुलेट 350 त्याच्या ब्रँडचा वारसा आणि कार्यप्रदर्शन इत्यादीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे प्रकार आणि त्यांची एक्स शोरूम किंमत व ईएमआय
1- बुलेट 350 मिलिटरी रेड आणि मिलिटरी ब्लॅक- या बाईकची किंमत एक लाख 73 हजार 562 रुपये असून याकरिता तुम्ही जर 34,712 रुपये डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला 3703 रुपये ईएमआय भरावा लागेल.
2- बुलेट 350 मिलिटरी सिल्वर रेड आणि मिलिटरी सिल्वर ब्लॅक- या बाईकची किंमत एक लाख 79 हजार रुपये असून बाईकसाठी तुम्ही 35 हजार 800 रुपये डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला मासिक तीन हजार आठशे पाचशे रुपये ईएमआय भरावा लागेल.
3- बुलेट 350 स्टॅंडर्ड मरून आणि स्टॅंडर्ड ब्लॅक- या बाईकची किंमत एक लाख 97 हजार 436 रुपये इतकी असून या बाईक करता जर तुम्ही 39 हजार 487 रुपये डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला 4029 रुपये इतका मासिक ईएमआय भरावा लागेल.
4- बुलेट 350 ब्लॅक गोल्ड – या बुलेटची किंमत दोन लाख पंधरा हजार आठशे एक रुपये असून या बुलेटसाठी जर 43,160 रुपयाचे डाऊनपेमेंट केले तर मासिक 4,266 रुपये इतका ईएमआय भरावा लागेल.