Samsung Galaxy : प्रतीक्षा संपली! सॅमसंगने आणला शक्तिशाली 5G फोन, बघा किती आहे किंमत?

Published on -

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनी टेक मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अशातच कपंनी देखील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन एका पेक्षा एक फोन मार्केटमध्ये लॉन्च करत असते. अशातच कंपनीने आणखी एक फोन लॉन्च केला आहे.

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने सोमवारी (27 मे) भारतीय बाजारात Galaxy F55 मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केला. हा 5G स्मार्टफोन भारतातील लेदर स्टिच बॅक पॅनलसह कंपनीचा पहिला फोन आहे.

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या फोनची किंमत किती आहे जाणून घेऊया…

फोन किंमत

कंपनीने हा फोन तीन स्टोरेज पर्यायांसह बाजारात आणला आहे. 128GB स्टोरेजसह 8GB रॅमची किंमत 26,999 रुपये आहे. 256GB स्टोरेजसह 8GB रॅमची किंमत 29,999 रुपये आहे आणि 12GB रॅमसह 256GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे. Flipkart वर 27 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता या फोनची विक्री सुरू झाली आहे.

5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये सॅमसंगचा ‘इतके’ टक्के वाटा

सॅमसंगने सोमवारी सांगितले की 5G स्मार्टफोन्सवर लक्ष केंद्रित केलेल्या त्यांच्या वाढीच्या धोरणामुळे चांगले परिणाम मिळाले आहेत आणि कंपनीने या वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत उद्योगाला मागे टाकले आहे. सॅमसंग इंडियाच्या एमएक्स डिव्हिजनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुलन म्हणाले की, संपूर्ण मोबाइल फोन उद्योगाच्या वाढीसाठी 5G वर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. पुलन म्हणाले की यामुळे 26.6 टक्के शेअरसह 5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ते म्हणाले की 20,000-30,000 रुपयांचा विभाग हा भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन श्रेणीतील सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News