Samsung Budget Smartphone : नवीन मोबाईल खरेदी करायचा आहे का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
येथे मोबाईलवर सुद्धा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन मोबाईल खरेदीला वेग आलाय. दरम्यान जर तुम्हीही नवा मोबाईल खरेदी करणार असाल विशेषता सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी अमेझॉन वर सुरू असणारी ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल फायद्याची ठरणार आहे.

येथे सॅमसंगच्या एका जबरदस्त फीचर्सच्या 5G स्मार्टफोनवर तब्बल 12,150 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. या डिस्काउंट ऑफरमुळे बजेट फोन खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला 20 हजाराच्या आतील फोन खरेदी करायचा असेल तर नक्कीच सॅमसंगचा हा भन्नाट स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता.
आम्ही ज्या फोन बाबत बोलत आहोत तो आहे सॅमसंग A35 5G. त्यामध्ये असणारे फीचर्स तुम्हाला नक्कीच वेडे बनवणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या फोनला लॉन्च होऊन जास्त दिवस काही झालेले नाहीत. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी सॅमसंग कडून लॉन्च करण्यात आला आणि लॉन्च झाल्यानंतर मध्यमवर्गीयांमध्ये याची लोकप्रियता प्रचंड वाढली.
या स्मार्टफोनला ग्राहकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. याच्या 8 जीबी रॅम +128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 30 हजार 999 रुपये होती. ही त्याची लॉन्चिंग प्राईस होती. पण आता हा स्मार्टफोन अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये 12150 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
या सेलमध्ये हा स्मार्टफोन फक्त 18849 रुपयांना विकला जातोय. यामुळे जर तुम्हाला बजेट फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या फोनचा विचार करायला हवा. वीस हजाराच्या आसपास तुमचे बजेट असेल तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.
विशेष म्हणजे या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1000 रुपयांचा बँक डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. तसेच 945 रुपयांचा कॅशबॅक ऑफरचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. जर या दोन्ही ऑफरचा लाभ मिळाला तर हा फोन तुम्हाला जवळपास 14 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला अमेझॉन वर एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हणजे तुम्ही तुमचा जुना फोन देऊन नवा फोन खरेदी करू शकता. तुमच्या जुन्या फोनची कंडिशन चांगली असेल तर तुम्हाला त्याची चांगली किंमतही मिळणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही अमेझॉन वर सॅमसंगचा हा A35 5G स्मार्टफोन फारच कमी किमतीत तुमच्या नावे करू शकणार आहात.
कसे आहेत फिचर्स ?
या फोनची स्क्रीन फारच मोठी आहे. 6.6 इंचाचा फुल एचडी + सुपर ॲमोलेड डिस्प्ले आहे. याचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याच प्रोसेसर सुद्धा मजबूत आहे. यात Exynos 1380 चिपसेट देण्यात आलय. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजचा हा फोन तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देणार आहे.
सॅमसंग प्रेमींसाठी हा फोन नक्कीच बेस्ट राहील. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. 50 MP मुख्य लेन्स, 8 चा अल्ट्रा वाइड लेन्स व 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी पण चांगल्या निघतात.
यासाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलाय. हा फोन अँड्रॉईड 14 आधारित One UI 6.1 वर चालतोय. उत्कृष्ट साउंड क्वालिटीसाठी डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट सुद्धा मिळतो.