Samsung Freedom Fest Sale : सॅमसंगची जबरदस्त ऑफर! स्मार्ट टीव्ही खरेदीवर मोफत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Freedom Fest Sale

Samsung Freedom Fest Sale : सॅमसंग ही देशातील सर्वात आघाडीची टेक कंपनी आहे. ही कंपनी बाजारात सतत नवनवीन उत्पादने लाँच करत असते. विशेष म्हणजे कंपनीच्या उत्पादनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. कंपनी सतत इतर टेक कंपन्यांना टक्कर देत असते.

परंतु त्यांच्या किमती जास्त असतात. जर तुम्हाला स्वस्तात कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता कंपनीने फ्रीडम फेस्ट ऑफरची घोषणा दिली आहे. या सेलमध्ये तुम्हाला कंपनीचे ओएलईडी टीव्ही, निओ क्यूएलईडी टीव्ही, क्यूएलईडी टीव्ही आणि क्रिस्टल 4के यूएचडी टीव्ही सवलतीत खरेदी करता येतील.

परंतु ही ऑफर इथेच संपली नाही. तुम्हाला आता या फोनवर 1 लाख रुपयांचा Galaxy S23 Ultra स्मार्टफोन मोफत मिळत आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही सेल सुरु असणार आहे. जाणून घ्या ऑफर.

सर्वात आनंदाची बाब म्हणजे तुम्ही आता सेलचा लाभ देशातील संपूर्ण आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक रिटेल स्टोअरमध्ये आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट Samsung.com वरून घेता येतो. आता वापरकर्ते सुलभ EMI पर्यायांसह 20% अतिरिक्त कॅशबॅक आणि 20,000 रुपयांच्या कमाल कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात.

जाणून घ्या कोणत्या टीव्ही कोणत्या वस्तू मिळत आहेत मोफत

या सेलमध्ये 1,24,999 किमतीचा Galaxy S23 Ultra 5G सॅमसंग 98-इंच निओ QLED आणि QLED टीव्ही आणि निओ QLED 8K टीव्हीच्या निवडक मॉडेलच्या खरेदीसह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासह, ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त 20% कॅशबॅक चा लाभ घेता येतो.

सॅमसंगने 55-इंच निओ QLED टीव्ही आणि 77-इंच OLED टीव्ही, खरेदी केलेल्या टीव्ही मॉडेलवर अवलंबून निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर 49,990 रुपये किंवा 17,990 रुपये किमतीचा विनामूल्य साउंडबार उपलब्ध करून देण्यात आला आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना 20% पर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे.

त्याशिवाय खरेदीदारांना 75-इंच आणि त्यावरील निओ QLED TV, QLED TV आणि Crystal 4K UHD TV च्या निवडक मॉडेल्ससह 20% कॅशबॅकसह 69,990 किमतीचे फ्रीस्टाइल प्रोजेक्टर देखील मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe