Samsung Galaxy : सॅमसंग कंपनी भारतीय बाजारात आणखी एक स्वस्त 5G मोबाईल फोन Samsung Galaxy M14 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन Samsung Galaxy M13 5G चे अपग्रेडेड व्हर्जन असेल जो कमी बजेटमध्ये लॉन्च केला जाईल.
Samsung Galaxy M14 5G फोनबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी लॉन्च होण्यापूर्वी Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे, जिथे फोनचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
amsung Galaxy M14 5G
Samsung Galaxy M14 5G फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. ही सूची 17 नोव्हेंबरची आहे जिथे फोन Samsung SM-M146B मॉडेल नंबरसह सूचीबद्ध आहे. या लिस्टिंग मध्ये हे स्पष्ट झाले आहे की सॅमसंग कंपनी येत्या काही दिवसात आपला नवीन स्मार्टफोन Galaxy A14 5G लॉन्च करणार आहे.
स्मार्टफोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स Geekbench वर देखील समोर आले आहेत. Samsung Galaxy M14 5G ला सिंगल-कोरमध्ये 751 आणि मल्टी-कोरमध्ये 2051 गुण मिळाले आहेत.
जर तुम्ही Samsung Galaxy M14 5G चे स्पेसिफिकेशन बघितले तर गीकबेंच नुसार, हा स्मार्टफोन Android 13 OS वर आधारित असेल, ज्यामध्ये 2.40 GHz पर्यंत क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.
त्याच वेळी, या स्मार्टफोनमध्ये Samsung Xnos 1330 चिपसेट देखील समोर आला आहे. हा सॅमसंग मोबाईल गीकबेंच वर 4 जीबी रॅम मेमरी सह स्पॉट झाला आहे. सॅमसंग लवकरच या स्मार्टफोनशी संबंधित घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
Samsung Galaxy M13 5G फोनबद्दल बोलायचे झाले तर त्याचा 4 GB RAM 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि 6 GB रॅम 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आजकाल हे दोन्ही प्रकार सॅमसंग ऑफर अंतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केले जाऊ शकतात, त्यानंतर Samsung Galaxy M13 5G ची किंमत 10,999 रुपये आणि 13,999 रुपये असेल.
Samsung Galaxy M13 5G फोन 6.6 इंच फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनला MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे.
फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे आणि फ्रंट पॅनलवर 8-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा सॅमसंग फोन 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो जो 15W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह काम करतो.