Samsung Galaxy M13 : जबरदस्त ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येईल Samsung चा हा शक्तिशाली फोन, कुठे मिळतेय संधी? पहा

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 : सध्या सर्वच स्मार्टफोनच्या किमती मागणी जास्त असल्यामुळे वाढल्या आहेत. अशातच जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

कारण आता तुम्ही Samsung Galaxy M13 हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला होता. आता त्यावर तुम्हाला ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

Samsung च्या या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM, 50MP कॅमेरा आणि 6000mAh मजबूत बॅटरी मिळत आहे. तसेच, हा स्मार्टफोन 4G सपोर्टसह येतो. जाणून घेऊया फोनच्या नवीन किंमती आणि फीचर्स.

किंमत

सॅमसंगकडून हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किमतीचा विचार केला तर या दोन्ही व्हेरियंटच्या किमतीत 1000 रुपयांनी कपात केली आहे. 4GB रॅम वेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी होती. परंतु आता तुम्ही हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये सहज खरेदी करू शकता. तर या स्मार्टफोनचा 6GB रॅम प्रकार 13,999 रुपयांना लॉन्च केला होता, जो आता तुम्हाला 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

हा स्मार्टफोन तुम्ही Aqua Green, Midnight Blue आणि Stardust Brown तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकता. तसेच कंपनी अतिरिक्त ऑफर्सही देत ​​आहे. सॅमसंग शॉप अॅपवर ग्राहकांना 2000 रुपयांचा स्वागतार्ह लाभ मिळेल. तसेच ग्राहकांना Samsung Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% कॅशबॅक मिळेल.

जाणून घ्या फीचर्स

Samsung Galaxy M13 मध्ये 6.6-इंचाचा FHD LCD Infinity-V डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. या फोनच्या स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे. हा स्मार्टफोन Octacore Exynos 850 प्रोसेसरवर काम करेल. यात दोन कॉन्फिगरेशन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीच्या स्मार्टफोनला 4GB RAM आणि 6GB RAM सह 128GB स्टोरेज मिळते. तर मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. Android 12 वर आधारित One UI वर हा फोन काम करतो. याच्या ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे.

5MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ कॅमेरा उपलब्ध असून फ्रंटमध्ये कंपनीने 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 15W चार्जिंगला समर्थन देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe