Samsung Galaxy S21 FE 5G : जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही स्वस्तात सॅमसंगचा जबरदस्त स्मार्टफोन सहज घरी नेऊ शकता.
सध्या फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही Samsung Galaxy S21 FE 5G हा स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्हाला या सेलचा लाभ घेता आला तर तुम्ही हा फोन 2000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या फोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे.
कमी किमतीत खरेदी करता येईल सॅमसंगचा जबरदस्त फोन
किमतीबद्दल बोलायचे झाले तर Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन Flipkart वर 46% सवलतीनंतर 39,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. तर, या फोनची मूळ किंमत 74,999 रुपये इतकी आहे. या फोनवर मिळणाऱ्या एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करून 37,999 रुपयांपर्यंत झटपट सवलत मिळू शकते.
एकंदरीतच या एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही हा शानदार सॅमसंग स्मार्टफोन अवघ्या 2,000 रुपयांमध्ये (39,999-37,999) खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफर जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. तरच तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल.
जाणून घ्या Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा सॅमसंगचा हा स्मार्टफोन 4500 mAh लिथियम-आयन बॅटरी सह तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनीने या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज दिले आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी तीन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात 12MP 12MP 8MP कॅमेरे आहेत. तर त्याच वेळी, या 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन 6.4 इंच फुल एचडी डिस्प्लेसह सुसज्ज असून जे 2340 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेटला समर्थन देतो. Octa Core सह येणारा हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.