Samsung Galaxy S25 Ultra:- सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा अखेर आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. 22 जानेवारीला भारतासह जागतिक बाजारात लाँच झालेल्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर ग्राहकांना विशेष ऑफर्स आणि बंपर सूट मिळणार आहे. जर तुम्ही नवीन आणि प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असू शकते.
या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स
Amazon India आणि अधिकृत सॅमसंग स्टोअर्सवर या स्मार्टफोनसाठी खास डिस्काउंट आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास 8,000 पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरद्वारे 12,000 पर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. EMI आणि No-Cost EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत.
या स्मार्टफोनचे प्रकार आणि किंमत
Samsung ने या सिरीजमध्ये Galaxy S25 Ultra व्यतिरिक्त Galaxy S25 आणि Galaxy S25 Plus हे दोन हँडसेट लाँच केले आहेत. S25 Ultra हा सर्वात प्रीमियम व्हेरियंट असून तो तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:
12GB RAM + 256GB स्टोरेज किंमत 1,11,999 रुपये
12GB RAM + 512GB स्टोरेज किंमत 1,29,999 रुपये
12GB RAM + 1TB स्टोरेज – किंमत 1,65,999 रुपये
Samsung Galaxy S25 Ultra चे पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले आणि डिझाइन
6.9-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, Corning Gorilla Armor Protection, अधिक टिकाऊ स्क्रीन यामध्ये देण्यात आली आहे. Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि सुपरफास्ट स्पीड आणि गेमिंगसाठी उत्तम 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज यामध्ये मिळते.
बॅटरी आणि चार्जिंग
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी दिवसभरासाठी पॉवरफुल बॅटरी बॅकअप उपलब्ध करून देते. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट यामध्ये मिळतो.
कॅमेरा सेटअप
यामध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून जो अल्ट्रा-हाय रिझोल्यूशन फोटोग्राफी करिता उत्तम आहे व त्यासोबतच 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
50MP टेलीफोटो लेन्स कॅमेरा यामध्ये समाविष्ट करण्यात आला असून तो झूम इन क्षमतांसाठी खूपच उपयुक्त आहे. 10MP चा चौथा कॅमेरा देण्यात आला असून तो अधिक चांगली डेप्थ सेन्सिंग करिता उपयुक्त आहे.12MP सेल्फी कॅमेरा हा उत्कृष्ट सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग करिता खूप फायद्याचा ठरेल.