सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय चक्क 19 हजार रुपयांचा डिस्काउंट !

Samsung Galaxy S25 : तुम्हालाही नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे. ही बातमी सॅमसंगच्या चाहत्यांसाठी अधिक खास राहील. आता कंपनीच्या एका लोकप्रिय मॉडेलवर हजारो रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. सॅमसंगच्या गॅलेक्सी S25 वर तब्बल 19 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. यामुळे हा हँडसेट खरेदीचा प्लॅन असल्यास ही एक मोठी संधी ठरणार आहे. खरे तर सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑ

ईन शॉपिंग साईटवर फेस्टिवल सेल सुरू आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू कमी किमतीत खरेदीची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अमेझॉन वर सुरू असणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन ग्राहकांना कमी किमतीत मिळणार आहे.

या हँडसेटवर येथे तुम्हाला 19 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की हा कंपनीचा एक फ्लॅगशीप स्मार्टफोन होता. मार्केटमध्ये लॉन्च झाला तेव्हा याची किंमत 81 हजार रुपये होती. पण आता अमेझॉन वर याची किंमत 62,895 झाली आहे.

सोबतच ग्राहकांना बँक ऑफरचाही लाभ मिळणार आहे. ग्राहकांना बँक ऑफरचा लाभ मिळाल्यानंतर याची किंमत फक्त 61 हजार 895 रुपये होते. अर्थात ग्राहकांना या फ्लॅगशिप मॉडेल वर 18 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच 1000 रुपयांचा अतिरिक्त बँक ऑफरचाही लाभ घेता येणार आहे.

म्हणजेच अमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन तब्बल 19000 रुपयांच्या डिस्काउंट मध्ये खरेदी करता येऊ शकतो. विशेष म्हणजे ग्राहकांकडे 62 हजार रुपयांचे बजेट नसेल तर ते हा फोन ईएमआय वर सुद्धा घेऊ शकतील.

अमेझॉन वर ग्राहकांसाठी अनेक EMI पर्याय उपलब्ध आहेत. फक्त 3,049 रुपये प्रति महिना EMI वर हा हँडसेट खरेदी करता येणार आहे. तसेच येथे ग्राहकांसाठी स्पेशल एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू करण्यात आली आहे.

ग्राहकांना आपल्याकडील जुना फोन एक्सचेंज करून चांगला एक्सचेंज बोनस मिळवता येणार आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 47 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. पण हा बोनस जुन्या फोनच्या मॉडेलवर आणि कंडिशनवर अवलंबून राहणार आहे.