Samsung Galaxy S26 : सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. Samsung Galaxy S26 सीरिजचे लाँच आता फार दूर नसल्याचे संकेत मिळत आहेत. विविध रिपोर्ट्सनुसार, ही सीरिज फेब्रुवारीच्या अखेरीस जागतिक बाजारात सादर केली जाऊ शकते.
लाँच जवळ येताच Galaxy S26 आणि Galaxy S26 Plus या मॉडेल्सचे रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले असून, त्यामुळे टेकप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Android Headlines च्या रिपोर्टनुसार, Galaxy S26 आणि S26 Plus चे डिझाइन आधीच्या S25 सीरिजसारखेच ठेवण्यात आले आहे. मात्र, कॅमेरा मॉड्यूलमध्ये थोडा बदल दिसून येतो. दोन्ही फोनमध्ये पातळ बेझल्स, मध्यभागी होल-पंच कटआउट आणि प्रीमियम लूक देण्यात येणार असल्याचे रेंडर्सवरून स्पष्ट होते.
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, Samsung Galaxy S26 मध्ये 6.3 इंचाची Full HD+ Dynamic AMOLED स्क्रीन दिली जाऊ शकते. तर Galaxy S26 Plus मध्ये यापेक्षा मोठी आणि अधिक शार्प Quad HD+ AMOLED पॅनल मिळण्याची शक्यता आहे.
सॅमसंगची AMOLED डिस्प्ले क्वालिटी आधीपासूनच बाजारात प्रसिद्ध असल्याने या फोनकडून उत्तम व्हिज्युअल अनुभव अपेक्षित आहे. कॅमेरा सेटअपच्या बाबतीत दोन्ही मॉडेल्समध्ये समान रियर कॅमेरा कॉन्फिगरेशन दिले जाऊ शकते.
यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
परफॉर्मन्ससाठी सॅमसंग यंदाही ड्युअल-चिप स्ट्रॅटेजी वापरण्याची शक्यता आहे. काही बाजारपेठांमध्ये Galaxy S26 सीरिज Exynos 2600 SoC सह लाँच होऊ शकते, तर काही देशांमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो. Galaxy S26 मध्ये सुमारे 4,300mAh क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता असून, फास्ट चार्जिंग सपोर्टही अपेक्षित आहे.
एकूणच, लीक झालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy S26 सीरिज ही डिझाइन, कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत एक मजबूत फ्लॅगशिप पर्याय ठरू शकते. आता अधिकृत लाँचचीच प्रतीक्षा आहे.













