सॅमसंने त्यांच्या फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 7 आज रात्री जगभरात लाँच केला आहे. नवीन Galaxy Z Fold 7 फोल्ड झाल्यावर फक्त ८.९ मिमी जाड असून, उघडल्यावर केवळ ४.२ मिमी इतका स्लीम आहे. वजनही आता फक्त २१५ ग्रॅम असून, हे मागील मॉडेलच्या तुलनेत अधिक हलके आहे.
जबरदस्त डिस्प्ले

फोनमध्ये ८-इंचाचा मेन डिस्प्ले आहे, जो डायनॅमिक AMOLED 2X Infinity Flex टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट, ३६८ppi पिक्सेल डेन्सिटी आणि २६०० निट्स ब्राइटनेस आहे. त्याचबरोबर, बाहेरचा ६.५-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8 Elite
Galaxy Z Fold 7 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite for Galaxy चिपसेट आहे – जो एक अत्यंत शक्तिशाली मोबाइल प्रोसेसर मानला जातो. यासोबत १६GB पर्यंत RAM आणि १TB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये Samsung AI सोल्युशन्ससह – Gemini Live, AI Results View, Circle to Search, Drawing Assist, आणि Writing Assist यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळतात.
२०० MP कॅमेरासह प्रीमियम फोटोग्राफी
फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे – ज्यामध्ये २००MP प्रायमरी कॅमेरा (OIS व क्वाड पिक्सेल ऑटोफोकससह), १२MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १०MP टेलीफोटो कॅमेरा (३x ऑप्टिकल झूमसह) यांचा समावेश आहे. कव्हर आणि इनर दोन्ही डिस्प्लेवर १०MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. नवीन ProVisual Engine चा वापर करून फोटोंना आणखी तीव्रता आणि स्पष्टता दिली जाते.
दमदार बॅटरी आणि चार्जिंग
हा फोल्डेबल फोनमध्ये ४४००mAh क्षमतेची बॅटरीसह येअसून २५W वायर्ड चार्जिंग, फास्ट वायरलेस चार्जिंग २.० आणि वायरलेस पॉवरशेअर सपोर्ट देण्यात आला आहे.इतर फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास Bluetooth 5.4, Wi-Fi 7, 5G, LTE आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. Android 8 आधारित One UI 16 देण्यात आले आहे.
आकर्षक रंग आणि स्टोरेज पर्याय
Galaxy Z Fold 7 चार आकर्षक रंगांत उपलब्ध आहे – Blue Shadow, Jet Black, Silver Shadow, आणि केवळ ऑनलाईनसाठी खास Mint. स्टोरेजसाठी २५६GB, ५१२GB आणि १TB असे तीन पर्याय आहेत. ग्राहक सॅमसंग इंडिया वेबसाइट आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हा स्मार्टफोन प्री-ऑर्डर करू शकतात, आणि त्यावर खास लाँच ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
Samsung Galaxy Z Fold 7 हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
बेस मॉडेलमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असून याची किंमत ₹1,74,999 आहे.
मिड व्हेरियंटमध्ये 12GB RAM आणि 512GB स्टोरेज असून याची किंमत ₹1,86,999 आहे.
टॉप व्हेरियंटमध्ये 16GB RAM आणि 1TB स्टोरेज देण्यात आली असून याची किंमत ₹2,10,999 आहे.
The wait is over 🎉 The future of #GalaxyAI is unfolding right here at Galaxy Unpacked. Stay close to this megathread for all the first impressions, experts’ reviews and can’t-miss product breakdowns! 😉 Which product are you hyped to see more reviews of? 👇
— Samsung Mobile (@SamsungMobile) July 9, 2025