Samsung Galaxy Z Fold 7 Smartphone:- सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट मिळण्याची शक्यता आहे असे काही तज्ञांनी अलीकडेच म्हटले आहे. दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने नुकतीच गॅलेक्सी A25 मालिका सादर केली ज्यात स्नॅपड्रॅगन ८ एलिट फॉर गॅलेक्सी चिपसेटचा समावेश आहे. आता कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या आगामी मालिकेच्या सादरीकरणाची चर्चा सुरू आहे. यामध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड ७ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ७ यांचा समावेश होऊ शकतो.
स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटचा वापर
टिपस्टर पांडाफ्लॅश (@PandaFlashPro) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली ज्यात त्यांनी म्हटले की,गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट असू शकतो.
याशिवाय, गॅलेक्सी झेड फ्लिप ७ मध्ये एक्सिनोस २५०० चिपसेट असू शकतो. टिपस्टरच्या मते गॅलेक्सी झेड फोल्ड ७ चे सर्व प्रोटोटाइप स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेटवर चालत आहेत. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी तसेच ५१२ जीबी स्टोरेज पर्याय असू शकतो.
दुसऱ्या टिपस्टरने देखील याच गोष्टीचा उल्लेख केला आहे.परंतु त्याने दावा केला आहे की, गॅलेक्सी झेड फ्लिप ७ मध्ये सॅमसंगचा एक्सिनोस २५०० चिपसेट असू शकतो. सॅमसंगने नेहमीच आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरले आहेत आणि एक्सिनोस २५०० चिपसेटसह हे पहिले फोल्डेबल स्मार्टफोन असू शकते.
या चिपसेटमध्ये Xclipse 950 GPU आणि आठ वर्कग्रुप प्रोसेसर असू शकतात, ज्यामध्ये AMD चे आर्किटेक्चर वापरण्याची शक्यता आहे. एक्सिनोस २५०० मध्ये १६-बिट 9.6 Gbps क्वाड-चॅनेल LPDDR5X मेमरी आणि UFS स्टोरेजचा समावेश असू शकतो.
कसा असेल कॅमेरा?
गॅलेक्सीक्लबच्या एका अहवालानुसार, गॅलेक्सी झेड फ्लिप ७ मध्ये गॅलेक्सी झेड फ्लिप ६ सारखाच कॅमेरा युनिट असण्याची शक्यता आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो, परंतु टेलिफोटो कॅमेरा असण्याची शक्यता कमी आहे. डिस्प्लेबाबत बोलायचं तर, गॅलेक्सी झेड फ्लिप ७ मध्ये ६.८५-इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि ४ इंचाची बाह्य स्क्रीन असू शकते.
सॅमसंगच्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनवर अनेक टिप्स आणि अफवांनी चर्चेला उचलून धरले आहे. याशिवाय गॅलेक्सी झेड फोल्ड ७ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ७ ची किंमत सध्याच्या गॅलेक्सी झेड फोल्ड ६ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ६ प्रमाणेच ठेवली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या या नवीनतम आवृत्त्यांमध्ये चांगल्या कार्यक्षमतेसाठी विविध तंत्रज्ञानाची जोड पाहायला मिळेल आणि हे स्मार्टफोन अधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्याची शक्यता आहे.