Samsung Galaxy : सॅमसंग कंपनीने आपले दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कपंनीने आपल्या Galaxy A सिरीज मधील फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Samsung Galaxy A35 आणि Samsung Galaxy A55 हे दोन फोन लॉन्च केले आहेत. या फोनची किंमती आणि स्पेसिफिकेशन्स पुढीलप्रमाणे :-
किंमत
Samsung Galaxy A35 ची जागतिक बाजारपेठेत किंमत 35000 रुपये आहे. तर Galaxy A55 ची किंमत जवळपास 43,360 रुपये आहे.
स्पेसिफिकेशन्स
Galaxy A55 आणि Galaxy A35 दोन्ही दिसायला सारखेच आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये 6.6 इंच फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, गोरिला ग्लास व्हिक्टस, 1000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा फोन OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह येतो, यात 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो रिअल कॅमेरा आहेत. दोन्ही डिव्हाइसमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.
याशिवाय, कंपनीने दोन्ही स्मार्टफोन्ससाठी 4 वर्षांची ऑपरेटिंग सिस्टीम आणि 5 वर्षांच्या सुरक्षा अपडेटचा दावा केला आहे. याशिवाय, दोन्ही मॉडेल्सना मुख्य IP67 रेटिंग आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.3 आहे.
Samsung Galaxy A35
Samsung Galaxy A35 मध्ये प्लास्टिक फ्रेम आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा स्मार्टफोन Exynos 1380 चिपसेटने सुसज्ज आहे. हा फोन Android 14 वर आधारित आहे. तसेच या फोनच्या समोर 13 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A55
Galaxy A55 ची रचना गेमिंगसाठी करण्यात आली आहे. हे Exynos 1480 चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबत AMD RDNA2 आधारित Xclipse 530 GPU देण्यात आला आहे. तसेच समोर 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल.