Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या उत्तम फीचर्स असलेला आणि स्वस्त फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंग कपंनी लवकरच आपला एक नवीन फोन लॉन्च करणार आहे, जो एक बजेट स्मार्टफोन असणार आहे. कंपनी हा फोन Galaxy F55 5G या नावाने मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे.
Samsung Galaxy F55 5G, 17 मे रोजी भारतात लॉन्च होणार आहे. या लॉन्चची माहिती कंपनीने स्वतः शेअर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये स्लीक डिझाईन आणि व्हेगन लेदरचा वापर केला जाणार असून स्टिचिंग पॅटर्नही उपलब्ध असेल. कंपनीने त्याच्या किंमतीबाबतही खुलासा केला आहे.
सॅमसंग इंडियाने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे, पोस्टमध्ये सॅमसंगने सांगितले की, हा फोन ऍप्रिकॉट क्रश आणि रायसिन ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये सादर केला जाईल. हा फोन 17 मे रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. त्याची किंमत 2X999 रुपये असल्याचे सांगितले जात आहे, आता ही किंमत प्रत्यक्षात काय असेल ते फोन लॉन्च झाल्यावरच समजेल.
Samsung Galaxy F55 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये दोन फोन पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, सॅमसंग डॉट कॉम आणि निवडक स्टोअरमधून खरेदी करता येईल.
Samsung Galaxy F55 5G वैशिष्ट्ये
Samsung Galaxy F55 5G संदर्भात लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये अनेक दावे समोर आले आहेत. या फोनमध्ये 50MP रियर आणि 50MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 6.7-इंचाचा फुल-एचडी सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले असू शकतो.
प्रोसेसर
सॅमसंगचा हा फोन Snapdragon 7 Gen 1 चिपसेट सह येऊ शकतो. यात 5,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट वायर चार्जर आहे. या स्मार्टफोनचे अनेक फिचर्स अद्याप समोर आलेले नाहीत. त्याची आणखी वैशिष्ट्ये येत्या काही दिवसांत समोर येतील.