Samsung S20 FE 5G Offer : अशी संधी पुन्हा नाही! सॅमसंगच्या या शानदार स्मार्टफोनवर मिळतेय 30,000 रुपयांची बंपर सूट, आजच घ्या लाभ

Samsung S20 FE 5G Offer

Samsung S20 FE 5G Offer : तुम्हीही प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच ती योग्य वेळ आहे. कारण सॅमसंगच्या एका शानदार स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे.

त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्हाला एक शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोन देण्यात येत असलेल्या डिस्काऊंटमुळे ग्राहकांची हजारो रुपयांची बचत होत आहे.

कमी बजेटमध्ये शानदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Samsung S20 FE 5G हा स्मार्टफोन Amazon ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करावा लागेल. Samsung S20 FE 5G या स्मार्टफोनवर 30,000 रुपयांची बंपर सूट दिली जात आहे.

सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. सॅमसंग कंपनीचा Samsung S20 FE 5G स्मार्टफोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Samsung S20 FE 5G हा स्मार्टफोन 2021 मध्ये लाँच करण्यात आला आहे.

Samsung S20 FE 5G ची नवीन किंमत

Samsung S20 FE 5G या स्मार्टफोनची किंमत 74,990 रुपये आहे. मात्र तुम्ही Amazon वरून तुम्ही हा स्मार्टफोन निम्म्याहून कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. Amazon कडून या स्मार्टफोनवर 53 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही 34,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सॅमसंग S20 FE 5G वर बँक ऑफर

Samsung S20 FE 5G या स्मार्टफोनवर अनेक बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत. ज्यामध्ये तुम्हाला HDFC बँक कार्डवरून EMI वर 1250 रुपयांची झटपट सूट मिळेल आणि HSBC बँक कार्डवरून खरेदी केल्यास 5 टक्के झटपट सूट मिळेल.

Samsung Galaxy S20 FE 5G ची वैशिष्ट्ये

Samsung S20 FE 5G स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 4500mAh बॅटरीमुळे हा स्मार्टफोन अधिक काळ चार्जिंग टिकवण्यास सक्षम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe