Samsung Smartphone : तुम्हालाही नवीन मोबाईल घ्यायचा आहे का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. विशेषता ज्यांना सॅमसंगचा नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची राहणार आहे. खरंतर सॅमसंगच्या एका स्मार्टफोनवर ग्राहकांना तब्बल 41 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळतोय.
सॅमसंगचा फ्लिप फोन घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. Samsung Galaxy Z Flip 6 या स्मार्टफोनवर 41 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. खरंतर सॅमसंगचा हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे.

त्यामुळे तुम्ही पण सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन घेणार असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. या स्मार्टफोनवर एका लोकप्रिय ई-कॉमर्स साइटवर हजारो रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
आधीच या फोनची किंमत हजारो रुपयांनी कमी झाली आहे आणि त्यातल्या त्यात आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना डिस्काउंट ऑफर सुद्धा मिळत आहे यामुळे या फोनची किंमत आधीच्या तुलनेत अधिक कमी झालेली दिसत आहे.
तुम्हाला जर हा कोण स्वस्तात खरेदी करायचा असेल तर नक्कीच ही संधी तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. अमेझॉन या लोकप्रिय शॉपिंग साइटवर या फोनची किंमत 43 हजार पाचशे रुपयांनी कमी झालेली आहे.
अमेझॉन वर जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला 41 हजार 99 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला बँक ऑफर्स सुद्धा लाभ घेता येऊ शकतो यामुळे हा डिस्काउंट आणखी वाढणार आहे.
जर ग्राहकांनी पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर ग्राहकांना अतिरिक्त अडीच हजार रुपयांची सूट मिळणार आहे. अर्थात ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांची बचत करता येणार आहे.
खरेतर हा स्मार्टफोन लॉन्च झाला त्यावेळी याची किंमत एक लाख 9 हजार 999 होती. पण अमेझॉन वर या स्मार्टफोनची किंमत बऱ्यापैकी कमी झाली आहे. अमेझॉन वर ग्राहकांना 41 हजार 99 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.
यामुळे येथे स्मार्टफोनची किंमत 68 हजार 900 रुपये एवढी झाली आहे. सोबतच बँक ऑफरचा लाभ घेतला तर अडीच हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. अर्थात ज्या लोकांचे 65 हजार रुपयांच्या आसपास बजेट असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.













