Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार 61 हजार रुपयांचा डिस्काउंट ! सेल संपण्याआधी खरेदी करा  

Published on -

Samsung Smartphone : तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का मग तुमच्यासाठी ॲमेझॉन वर सुरू असणारी ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल फायद्याची ठरणार आहे. अमेझॉनच्या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळतोय. अनेक ब्रँडेड स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी ॲमेझॉनच्या सेलवर उपलब्ध झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे अमेझॉनच्या सेलमध्ये सॅमसंगच्या एका फोल्डेबल स्मार्टफोनवर तब्बल 61 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. एवढेच नाही तर याच्या खरेदीवर तुम्हाला बँक ऑफर्सचा देखील लाभ मिळणार आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 5G या कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोनवर ग्राहकांना मोठा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही हा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर नक्कीच ही तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. पण ॲमेझॉन वर सुरू असणारी सेल 5 ऑक्टोबरला समाप्त होईल.

यामुळे जर तुम्हाला हा फोन कमी किमतीत घ्यायचा असेल तर आज – उद्याला खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान आता आपण अमेझॉनच्या या स्मार्टफोनवर सुरू असणारी ही ऑफर नेमकी कशी आहे याची पूर्ण माहिती जाणून घेऊयात.

ग्राहकांना मिळणार 64 हजाराचा डिस्काउंट 

सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 6 5G हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन 1,64,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनचे 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरियंट आता अमेझॉन वर एक लाख तीन हजार 999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जेव्हा सॅमसंगचे हे व्हेरिएंट लॉन्च झाले तेव्हा याची किंमत एक लाख 64 हजार 999 होती.

अर्थातच अमेझॉनच्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 61 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ग्राहकांना सेलमध्ये या फोनवर थेट 61 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. या किमतीत तुम्हाला सिल्वर शाडो व नेव्ही ब्लू कलर रंगाचे फोन मिळणार आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे अमेझॉन ची ऑफर इथेच संपत नाही. इथे तुम्हाला 61 हजार रुपयांचा थेट डिस्काउंट तर मिळणारच आहे याशिवाय तुम्हाला बँक ऑफरचा सुद्धा लाभ दिला जाईल. जर ग्राहकांनी हा स्मार्टफोन आयसीआयसीआय बँक च्या क्रेडिट कार्ड वर खरेदी केला तर ग्राहकांना अतिरिक्त 3119 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

हा डिस्काउंट तुम्हाला अमेझॉन पे च्या माध्यमातून कॅशबॅक स्वरूपात दिला जाईल. म्हणजे तुम्हाला या फोनच्या खरेदीसाठी केवळ एक लाख 880 रुपये खर्च करावे लागतील. ग्राहकांना आपला जुना स्मार्टफोन सुद्धा एक्सचेंज करता येणार आहे.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या कंडीशन नुसार 47 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ग्राहकांना दिला जाऊ शकतो. नक्कीच या ऑफरचा लाभ घेतल्यास ग्राहकांना सॅमसंगचा हा प्रीमियम स्मार्टफोन फारच कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe