Samsung Holi Sale : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. सॅमसंग सध्या आपल्या स्मार्टफोन्सवर सूट देत आहे. सध्या कंपनी होळी सेलमध्ये स्वस्तात फोन विकत आहे. कंपनी कोणत्या मोबाईल फोनवर सूट देत आहे पाहूया…
कपंनीच्या या ऑफर्सचा लाभ तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत साइट, शॉपिंग ॲप आणि विशेष स्टोअर्सवर मिळेल. ऑफर कधी पर्यंत लागू आहे जाणून घ्या.
या सेलमध्ये कंपनी Galaxy स्मार्टफोन्सवर 60 टक्के आणि निवडक उपकरणांवर 48 टक्के सूट देत आहे. या विक्रीचा लाभ घेऊन तुम्ही सॅमसंगची प्रीमियम आणि जीवनशैली उत्पादने खरेदी करू शकता.
सॅमसंगचा हा सेल 15 मार्चपासून सुरू झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर उपकरणे खरेदी करू शकाल. तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईट, सॅमसंग शॉप, ॲप आणि कंपनीच्या खास स्टोअरवरून फोन सेलमध्ये खरेदी करू शकता. लक्षात घ्या सॅमसंग होली सेल 26 मार्च पर्यंत चालेल.
स्मार्टफोनवर ऑफर
या सेलद्वारे तुम्ही सॅमसंग फोन 60 टक्क्यांपर्यंत सवलतीत खरेदी करू शकाल. ब्रँडच्या नवीनतम Galaxy S24 मालिकेतील फोनवरही ऑफर उपलब्ध असतील. याशिवाय, तुम्ही गेल्या वर्षीचे फ्लॅगशिप डिव्हाइस स्वस्तात खरेदी करू शकाल. तुम्हाला फोल्ड आणि फ्लिपवर विक्रीचा लाभ देखील मिळेल.
तुम्हाला Galaxy Book लॅपटॉपवर 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. नवीनतम मालिकेत Galaxy Book 4 Pro, Galaxy Book 4 Pro 360 आणि Galaxy Book 4 360 वरही आकर्षक ऑफर आहेत. याशिवाय, तुम्ही 55 टक्के सवलतीत टॅब्लेट खरेदी करू शकता.
सॅमसंग टॅब्लेट व्यतिरिक्त, तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी वॉच 6 मालिका आणि अलीकडेच लॉन्च केलेला Galaxy Fit 3 स्वस्तात देखील खरेदी करू शकता. यावर 55 टक्के पर्यंत सूट देखील उपलब्ध आहे. याशिवाय सॅमसंग टीव्हीवर तुम्हाला 48 टक्के सूट मिळत आहे.