Samsung Galaxy : सॅमसंगचा सगळ्यात जबरदस्त फोन झाला स्वस्त; ॲमेझॉनवर कमी किंमतीत करा खरेदी…

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये सर्वात लोकप्रिय सॅमसंग आहे, सॅमसंग ही एकमेव अशी कपंनी आहे जी सर्व मोबाईल फोन्सला टक्कर देते. अशातच जर तुम्हाला या कंपनीचा सर्वात जबरदस्त फोन स्वस्तात मिळत असेल तर? होय आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक डील घेऊन आलो आहोत जी याआधी तुम्ही पहिली नसेल.

तुम्ही सॅमसंगचा Samsung Galaxy S23 5G हा फोन खूप स्वस्तात दरात खरेदी करू शकता. शॉपिंग वेबसाईट मधले सर्वात मोठे नाव ॲमेझॉन सध्या या फोनवर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे.

या सॅमसंग मोबाईलच्या किंमती आणि ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 128GB वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. तर त्याचा 256 GB व्हेरिएंट 69,999 रुपये आहे.

कंपनी आणि ॲमेझॉनच्या बँक ऑफर अंतर्गत तुम्ही या फोनसाठी एचडीएफसी बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 9000 रुपयांची सूट मिळेल. यानंतर या फोनची किंमत 55,999 रुपये होईल. याशिवाय 27,600 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिला जात आहे. अशास्थितीत हा जबरदस्त 5G फोन तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S23 5G फीचर्स

-या हँडसेटमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
-जे 2340×1080 रिझोल्युशन पिक्सेलसह येते.
-हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
-हे दोन स्टोरेज व्हेरियंट 128GB आणि 256GB सह येते.
-कामगिरीच्या बाबतीत, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 प्रोसेसर आहे.
-फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 50MP प्राथमिक कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.
-सेल्फीसाठी, समोर 12MP कॅमेरा आहे. याच्या मदतीने तुम्ही चांगले फोटो क्लिक करू शकता.
-पॉवरसाठी, या डिव्हाइसमध्ये 3900 mAh लिथियम आयन बॅटरी आहे. जो फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe