Samsung Galaxy : सॅमसंगचा प्रीमियम फोन Galaxy S24 5G झाला तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला Samsung Galaxy S24 5G सीरीज लाँच केली होती. आता कपंनी या सीरीजवर मोठा डिस्काउंट देत आहे. या सीरीजचा फक्त बेस व्हेरिएंट 79,999 रुपयांना येतो. ही सिरीज महाग असल्याने प्रत्येकाला ते विकत घेता येत नव्हते, मात्र आता त्यावर मोठी सूट दिली जात आहे. कपंनीने यामध्ये किती घसरण केली आहे, पाहूया…

Samsung Galaxy S24 5G सीरीजचा बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह येतो. Amazon वर त्याची किंमत 79,999 रुपये आहे. पण, आता या स्मार्टफोनच्या किंमतीत 22 टक्क्यांनी मोठी कपात करण्यात आली आहे. या सवलतीनंतर तुम्ही Samsung Galaxy S24 फक्त 62,440 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S24 वर 22 टक्के सूट मिळवून तुम्ही थेट 17,559 वाचवू शकता. फ्लॅट डिस्काउंटसोबत, कंपनी ग्राहकांना इतर अनेक ऑफर देखील देत आहे ज्यामध्ये तुम्ही अतिरिक्त पैसे वाचवू शकता. तुम्हाला काही निवडक बँक कार्डवर 1750 रुपयांची झटपट सूट देखील मिळेल.

Amazon आपल्या ग्राहकांना Samsung Galaxy S24 च्या खरेदीवर बंपर एक्सचेंज ऑफर देत आहे. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असल्यास, तुम्ही 30,800 रुपयांपर्यंतच्या किमतीत त्याची देवाणघेवाण करून मोठ्या बचतीचा लाभ घेऊ शकता. पण लक्षात ठेवा तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारे मूल्य तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Samsung Galaxy S24 5G फीचर्स

Samsung ने Samsung Galaxy S24 5G मध्ये 6.2 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे.

डिस्प्ले वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट, HDR10 सपोर्ट आणि 2600 nits चा पीक ब्राइटनेस मिळेल.

डिस्प्लेमध्ये संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 देण्यात आला आहे.

आउट ऑफ द बॉक्स, Galaxy S24 5G Android 14 वर चालतो.

Galaxy S24 5G मध्ये कार्यक्षमतेसाठी Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे.

या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50 10 12 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे.

स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, यात 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe