Samsung Galaxy : आजपासून सॅमसंगच्या ‘या’ दोन फोनची विक्री सुरु, बघा किंमत!

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने नुकतेच आपले दोन फोन भारतातील मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच हे फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. अशातच जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे पर्याय उत्तम असतील, चला या फोनच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

हे दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि सुपर AMOLED स्क्रीनसह येतात. कंपनीने A55 मध्ये Exynos 1480 प्रोसेसर दिला आहे, तर Galaxy A35 मध्ये Exynos 1380 प्रोसेसर उपलब्ध आहे. या स्मार्टफोन्सची किंमत पुढीलप्रमाणे :-

किंमत

Samsung ने Galaxy A35 5G दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. त्याच्या 8GB रॅम 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. तर त्याच्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. Galaxy A54 5G बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने याला तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केले आहे.

या हँडसेटच्या 8GB रॅम 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 45,999 रुपये आहे.

लॉन्च ऑफर अंतर्गत, तुम्हाला या स्मार्टफोन्सवर 3000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. ही ऑफर निवडक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर उपलब्ध आहे. त्यांची विक्री 14 मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे.

वैशिष्ट्य

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. A55 मध्ये स्क्रीन संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 1480 प्रोसेसरसह येतो. यात 12GB पर्यंत रॅम आहे.

यामध्ये 256GB पर्यंत स्टोरेज असेल. दोन्ही फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 वर काम करतात. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP67 रेटिंग, 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग आहे. Galaxy A55 मध्ये 50MP 12MP 5MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. समोर, कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा प्रदान केला आहे.

Galaxy A35 बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. यात 50MP, 8MP 5MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. समोर कंपनीने 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. Galaxy A35 5G फोन Exynos 1380 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe