Smartphone Launch : फेब्रुवारी 2026 हा भारतातील स्मार्टफोन बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि रोमांचक ठरणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक नामांकित स्मार्टफोन कंपन्या आपले नवीन मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहेत.
विशेष म्हणजे, यावेळी फ्लॅगशिप, प्रीमियम मिड-रेंज आणि परफॉर्मन्स-केंद्रित फोन अशा प्रत्येक सेगमेंटमध्ये ग्राहकांना नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग, अॅपल, विवो, iQOO आणि मोटोरोलासारख्या कंपन्या फेब्रुवारीमध्ये मोठे सरप्राइज देण्याची शक्यता आहे.

सर्वात आधी विवो कंपनीकडे पाहिले तर, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत Vivo V70 आणि Vivo V70 Elite हे स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. V-सीरीज ही विवोची डिझाइन आणि कॅमेरा-केंद्रित सीरीज म्हणून ओळखली जाते.
नव्या मॉडेल्समध्ये प्रीमियम लुक, सुधारित कॅमेरा सेन्सर आणि दमदार परफॉर्मन्स मिळण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, या दोन्ही फोनची किंमत 55 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते, त्यामुळे प्रीमियम मिड-रेंज ग्राहकांसाठी हे फोन आकर्षक ठरू शकतात.
याच महिन्यात iQOO आपला नवीन स्मार्टफोन iQOO 15R सादर करू शकते. 24 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता असलेला हा iQOO चा ‘R’ ब्रँडिंग असलेला पहिला फोन असेल. Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसरसह हा फोन कमी किमतीत फ्लॅगशिपसारखा परफॉर्मन्स देऊ शकतो. विशेषतः गेमिंग आणि पॉवर यूझर्ससाठी हा फोन एक मजबूत पर्याय मानला जात आहे.
मोटोरोलाही फेब्रुवारीत मोठा दाव टाकण्याच्या तयारीत आहे. Motorola Edge 70 Fusion मध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर आणि 7,000mAh बॅटरी मिळू शकते. IP68 आणि IP69 रेटिंगमुळे हा फोन मजबुती आणि टिकाऊपणासाठी ओळखला जाऊ शकतो.
फेब्रुवारीतील सर्वात मोठा लॉन्च सॅमसंगचा Galaxy S26 सीरीज असण्याची शक्यता आहे. Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra या मॉडेल्समध्ये कॅमेरा, प्रोसेसर आणि डिस्प्लेवर विशेष भर दिला जाणार आहे. Galaxy Unpacked 2026 इव्हेंट 25 फेब्रुवारीला होण्याची चर्चा आहे.
दरम्यान, अॅपलही या शर्यतीत मागे नाही. iPhone 17e हा तुलनेने स्वस्त आयफोन फेब्रुवारीच्या अखेरीस लॉन्च होऊ शकतो. A19 चिप आणि फेस आयडीसह येणाऱ्या या फोनची किंमत 64,999 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
एकूणच, फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन खरेदीदारांसाठी अनेक नवीन, दमदार आणि वेगवेगळ्या बजेटमधील पर्याय घेऊन येणार असून बाजारातील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.












