Smartphone News: OnePlus 12 सिरीजची किंमत लीक! मिळेल 16 जीबी रॅम आणि इतर भन्नाट वैशिष्ट्ये, वाचा किंमत

Ajay Patil
Published:
oneplus 12 series

Smartphone News:- वनप्लस लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून या महिन्यात म्हणजेच 23 जानेवारी रोजी वनप्लस 12 आणि वनप्लस 12R लॉन्च करणारा असून यापैकी वन प्लस बारा हा चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.

यामध्ये वन प्लस 12 हा चिनी फीचरसह भारतामध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे तर वनप्लस 12R च्या वैशिष्ट्यांची अद्याप पर्यंत कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. चीनमध्ये लॉन्च होणाऱ्या वनप्लस Ace 3 ची रिब्रँडेड आवृत्ती असण्याची शक्यता आहे.याच स्मार्टफोनची इतर माहिती आपण या लेखात बघू.

 वनप्लस 12R ची वैशिष्ट्ये

स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर वनप्लस 12R मध्ये असण्याची शक्यता आहे तसेच अँड्रॉइड 14 वर आधारित ऑक्सिजन OS 14 वर हँडसेट काम करेल. यामध्ये 6.78 इंचाचा  LTPO डिस्प्ले असणार असून जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. स्क्रीनच्या संरक्षणाकरिता गोरील्ला ग्लास व्हीक्ट्स दोन प्रदान केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल, आठ मेगापिक्सल आणि दोन मेगापिक्सलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप असणार आहे. तसेच समोर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील कंपनीकडून देण्यात येईल अशी शक्यता आहे. तसेच यामध्ये 5500mAh बॅटरी आणि 100W जलद चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकतो.

 वनप्लस 12 ची वैशिष्ट्ये

वनप्लस बारा मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen तीन प्रोसेसर वन प्लस 12 मध्ये उपलब्ध असेल. मध्ये अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सिजन ओएस उपलब्ध असताना याचा डिस्प्ले हा 6.82 इंचाचा  LTPO OLED पॅनलचा येतो व 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो

व त्याशिवाय यामध्ये 50 मेगापिक्सल, 64 मेगापिक्सल आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फीकरिता 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. तसेच चार्जिंगसाठी यामध्ये 5400mAh बॅटरी देण्यात आलेली असून ती 100W चार्जिंगला सपोर्ट करते.

 किती असेल किंमत?

जर आपण टिप्सटर योगेश ब्रारने सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर पोस्ट केले व या पोस्ट नुसार पाहिले तर वनप्लस बारा भारतामध्ये ग्रीन आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर हा हँडसेट 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला

जाण्याची शक्यता असून त्याची किंमत 58 हजार ते साठ हजार रुपये असू शकते. तर वनप्लस 12R ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करू शकते. यामध्ये फ्लेगशिप मॉडेल प्रमाणे रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन मिळणार आहे. या हँडसेटची सुरुवातीची किंमत 40 हजार ते 42 हजार रुपये दरम्यान असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe