Samsung Galaxy : लवकरच सॅमसंगचाही बजेट फ्रेंडली 5G फोन मार्केटमध्ये करणार एंट्री; ‘हे’ आहेत नवे फीचर्स…

Content Team
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग ही अशी मोबाईल कपंनी आहे जी सारखीच मार्केटमध्ये आपली नवीन उपकरणे लॉन्च करत असते, ही एकमेव अशी कपंनी आहे जी  मार्केटमधील सर्व मोबाईल फोन्सना टक्कर देते, अशातच कपंनी आणखी एक फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा कोणता फोन मार्केटमध्ये येणार आहे पाहूया…

सॅमसंग कंपनी लवकरच Samsung Galaxy C55 5G लॉन्च करू शकते. दक्षिण कोरियाच्या कंपनीचा हा स्वस्त 5G स्मार्टफोन क्वालकॉमच्या बजेट प्रोसेसरसह येऊ शकतो. हा स्मार्टफोन नुकताच Google Play Console या सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Galaxy M55 आणि Galaxy F55 सारख्या फीचर्ससह येऊ शकतो. फोनचा लुक आणि डिझाईन देखील सॅमसंगच्या या वर्षी लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्सप्रमाणे असेल.

सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन मॉडेल नंबर m55xq सह Google Play Console वर लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर उपलब्ध असेल. फोनमध्ये 8GB रॅमसह Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 6.0 असेल. इतकंच नाही तर फोनच्या डिस्प्ले गुणवत्तेचीही माहिती लिस्टिंगमध्ये समोर आली आहे. हा स्मार्टफोन FHD OLED डिस्प्लेसह येईल, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल असू शकते.

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास Samsung Galaxy C55 च्या मागील ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. फोनमध्ये 50MP मेन, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP थर्ड लेन्स असतील. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. या वर्षी लॉन्च झालेल्या Samsung च्या Galaxy A55 5G मध्ये Exynos 1480 प्रोसेसर आहे.

Galaxy M55 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये

त्याच वेळी, जर आपण Samsung Galaxy M55 5G च्या आतापर्यंत समोर आलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, हा फोन 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर देखील असेल, ज्यामध्ये 5000mAh बॅटरी आणि 45W वायर्ड फास्ट चार्जिंग फीचर असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe