Steam Machine Gaming Console : गेमर्स भिडुंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर गेमिंग साठी मार्केटमध्ये तुम्हाला असंख्य गॅजेट्स पाहायला मिळतील. मार्केटमध्ये उपलब्ध गॅजेट्समुळे गेमिंगचा एक्सपिरीयन्स नेक्स्ट लेव्हलला पोहचलाय.
गेल्या का वर्षांमध्ये मार्केटमध्ये असे काही गॅजेट्स आले आहेत ज्यामुळे गेमिंगचा अनुभव खरचं जबरदस्त अन अगदीच रोमांचक बनलाय. बाजारात चांगला गेमिंग अनुभव आणि गेमिंगमध्ये रियालिटी वाढविण्यासाठी अनेक गॅझेट्स उपलब्ध आहेत.

गेमर्स भिडू त्यांचा गेमिंग अनुभव वाढवण्यासाठी नेहमीच नवनवीन गॅजेट्सच्या शोधात असतात. दरम्यान जर तुम्हीही गेमिंग साठी नवीन गॅजेट शोधत असाल तर आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत.
त्यामुळे एकही शब्द न टाळता आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. खरंतर अनेकांना लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी गेमिंग कन्सोल सारखे गॅजेट हवे असतात. तुम्हाला पण गेमिंग कन्सोल हवं असेल तर तुमच्यासाठी व्हॉल्व्ह स्टीम मशीन लवकरच एक खास हत्यार घेऊन येणार आहे.
हे तर एवढं खास आणि पावरफुल राहणार आहे की ज्यामुळे तुमचा गेमिंगचा अनुभव आणखी हायटेक होणार आहे. व्हॉल्व्ह स्टीम मशीनच्या याच अपकमिंग गेमिंग कन्सोल बाबत आज आपण या लेखातून डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्टीम मशीन गेमिंग कन्सोलचे फीचर्स कसे असतील ?
व्हॉल्व्ह स्टीम मशीन लवकरच धुरळा उडवणार आहे. कारण ती लवकरच गेमिंग कन्सोल लाँच करणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे अपकमिंग गेमिंग कन्सोल 4K, 60fps वर गेमिंगला सपोर्ट करेल आणि अंदाजे सहा पट अधिक शक्तिशाली असेल, ज्यामुळे प्रमुख गेम खेळणे खूप सोपे होईल.
हे हत्यार लाँचिंगच्या वेळी दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 512 जीबी आणि 2 टीबी अशा दोन स्टोरेज पर्यायासह नवीन मॉडेल लॉन्च होण्याची शक्यता आहे. ते स्टँडअलोन हार्डवेअर म्हणून खरेदी केले जाऊ शकते किंवा नवीन “स्टीम-ब्रँडेड” कंट्रोलरसह एकत्रित केले जाऊ शकते.
कंट्रोलरमध्ये मॅग्नेटिक थंबस्टिक्स आणि दोन ट्रॅकपॅड असतील, जे स्वतंत्रपणे विकले जातील, ज्यामुळे गेमर्सना त्यांचा पसंतीचा पर्याय निवडता येईल. व्हॉल्व्हच्या डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टीममध्ये आधीच 40 दशलक्षाहून अधिक दैनिक सक्रिय गेमर्स आहेत.
आता या नवीन मशीनवर स्टीम गेम्सना देखील समर्थन दिले जाईल, ज्यामुळे वापरकर्ते नवीन हार्डवेअरवर त्यांच्या विद्यमान गेम लायब्ररी सहजपणे वापरू शकतील. याव्यतिरिक्त, व्हॉल्व्हने एक नवीन व्हीआर हेडसेट, स्टीम फ्रेम लाँच करण्याची घोषणा देखील केली आहे, जो या कन्सोल आणि स्टीम ओएससह कार्य करेल.
मात्र या नव्या हत्याराची किंमत अजून समोर आलेली नाही. पण अनेकांचे असे म्हणणे आहे की यामध्ये अनेक नवीन आणि शक्तिशाली फीचर्स ऍड होत असल्याने याची किंमत आधीच्या स्टीम डेकपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.











