अशी संधी नाही पुन्हा!108MP कॅमेरा आणि 256GB स्टोरेज असलेला 5G स्मार्टफोन फक्त 11999 मध्ये…

भारतीय स्मार्टफोन बाजारात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि त्यातच टेक्नोने आपल्या POVA सिरीजमधील नवीन मॉडेल्स सादर करून ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने Tecno POVA 6 Pro आणि POVA 6 Neo 5G हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले होते.

Ratnakar Ashok Patil
Published:

Techno Pova Series:- भारतीय स्मार्टफोन बाजारात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि त्यातच टेक्नोने आपल्या POVA सिरीजमधील नवीन मॉडेल्स सादर करून ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने Tecno POVA 6 Pro आणि POVA 6 Neo 5G हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले होते.

आता या सिरीजमध्ये लवकरच Tecno POVA 6 5G देखील सामील होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच POVA 6 Neo 5G या मॉडेलवर जबरदस्त सूट दिली जात आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह 5G स्मार्टफोन शोधत असाल तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Tecno POVA 6 Neo 5G वर आकर्षक डिस्काउंट

Tecno POVA 6 Neo 5G च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची लाँच किंमत 13,999 होती. मात्र सध्या हा फोन अ‍ॅमेझॉनवर आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे. ग्राहकांना 1,000 कुपन डिस्काउंट तसेच 1,000 पर्यंत बँक ऑफर मिळू शकते व ज्यामुळे या फोनची इफेक्टिव्ह किंमत फक्त 11,999 राहते.

बँक ऑफरअंतर्गत

HDFC बँक क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांहून अधिक कालावधीसाठी EMI ट्रान्झॅक्शन केल्यास 10% किंवा जास्तीत जास्त ₹
1,000 पर्यंत सूट दिली जात आहे. तसेच IDFC First, HSBC, Federal Bank आणि BOBCARD वापरणाऱ्या ग्राहकांना देखील 7.5% किंवा 1,000 पर्यंत डिस्काउंट मिळतो. त्यामुळे तुम्हाला हा फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Tecno POVA 6 Neo 5G चे दमदार स्पेसिफिकेशन्स

Tecno POVA 6 Neo 5G चा डिस्प्ले

हा स्मार्टफोन 6.67-इंचाच्या HD+ IPS LCD डिस्प्लेसह येतो. ज्याचे 720 × 1600 पिक्सल रेजोल्यूशन आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट करतो. यामुळे गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव अधिक स्मूथ होतो. तसेच 480nits ब्राइटनेस असल्याने उजेडातही चांगली दृश्यता मिळते.

Tecno POVA 6 Neo 5G चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Tecno POVA 6 Neo 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा आणि AI लेन्स आहे.जो स्पष्ट आणि उच्च-गुणवत्तेचे फोटो क्लिक करण्यास सक्षम आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला असून त्यासोबत एलईडी फ्लॅश देखील आहे.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स

हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटवर चालतो. जो उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असल्याने मल्टीटास्किंग आणि स्टोरेजची कोणतीही अडचण जाणवत नाही.

बॅटरी आणि चार्जिंग

स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकते. यासोबत 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याने फोन पटकन चार्ज करता येतो.

थोडक्यात वाचा संपूर्ण डील

फोन: Tecno POVA 6 Neo 5G,डिस्प्ले 6.67-इंच HD+ IPS LCD,120Hz रिफ्रेश रेट,प्रोसेसर MediaTek Dimensity 6300,रॅम आणि स्टोरेज 8GB RAM + 256GB स्टोरेज,कॅमेरा 108MP + AI लेन्स (रियर), 8MP (फ्रंट),बॅटरी 5,000mAh, 18W फास्ट चार्जिंग आणि किंमत 11,999 (डिस्काउंट आणि बँक ऑफर्सनंतर) इतकी आहे.

जर तुम्हाला स्वस्तात 108MP कॅमेरा, 256GB मेमरी आणि दमदार प्रोसेसर असलेला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर Tecno POVA 6 Neo 5G तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. ही ऑफर मर्यादित काळासाठीच असल्यामुळे लवकरात लवकर खरेदी करण्याचा विचार करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe