Realme आपल्या P3 सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन आज अर्थात 18 फेब्रुवारी 2025 रोजी लॉन्च करणार आहे. या मालिकेतील दोन दमदार स्मार्टफोन Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G असतील. या दोन्ही फोनमध्ये अत्याधुनिक डिझाइन, शक्तिशाली बॅटरी आणि नवीनतम प्रोसेसर देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे फोन अंधारात चमकणार आहेत आणि पाण्यात बुडूले तरी चालणार आहेत!
Realme ने आपल्या नवीन P3 सीरीजमध्ये अतिशय आधुनिक आणि अनोखी फीचर्स दिली आहेत. या फोनचे विशेष डिझाइन, मोठी बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि वॉटरप्रूफ क्षमतांमुळे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही 5G स्मार्टफोनसाठी अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन्ही उत्तम पर्याय ठरू शकतात!

Realme P3x 5G च्या लुनर सिल्व्हर व्हेरिएंटमध्ये एक खास “स्टेलर आइसफील्ड” डिझाइन असेल, जो प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्याचा रंग बदलेल. हे स्मार्टफोन IP68 + IP69 सर्टिफिकेशनसह येत असल्याने पाणी आणि धुळीपासून पूर्ण संरक्षण मिळेल. चला तर मग, या दोन नव्या स्मार्टफोनचे संपूर्ण वैशिष्ट्ये आणि किंमती जाणून घेऊया.
Realme P3 Pro आणि P3x 5G चे प्रोसेसर
Realme P3 Pro हा Snapdragon 7S Gen 3 चिपसेट असलेला सेगमेंटमधील पहिला फोन आहे. तर, Realme P3x 5G हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो MediaTek Dimensity 6400 5G प्रोसेसरसह येईल. हे दोन्ही प्रोसेसर गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अतिशय ताकदवान मानले जातात.
Realme P3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme P3 Pro मध्ये दमदार 50MP फ्रंट कॅमेरा असेल, जो OIS (Optical Image Stabilization) तंत्रज्ञानासह येईल. फोनमध्ये f/1.8 अपर्चर आणि 24mm फोकल लांबीचा सेन्सर असेल, जो लो-लाइट फोटोग्राफीसाठी उपयुक्त ठरेल. Realme P3 Pro मध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी असेल, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमध्ये BGMI टूर्नामेंट-प्रमाणित गेमिंग परफॉर्मन्स असेल आणि तो GT Boost फीचर सह येईल, जो विशेषतः हाय-परफॉर्मन्स गेमिंगसाठी डिझाइन केला आहे.
Realme P3x 5G स्पेसिफिकेशन्स
Realme P3x 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. या फोनचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे ड्युअल IP रेटिंग (IP68 + IP69) असणे. यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित असेल. तसेच, हा मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टंट स्मार्टफोन असेल. गेमिंग आणि हाय-परफॉर्मन्स अॅप्सदरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी, यात 6,050 mm² कूलिंग चेंबर दिला जाईल.
Realme P3 Pro 5G ची किंमत
Realme P3 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत ₹25,000 च्या आसपास असू शकते. त्याचा पूर्वीचा मॉडेल Realme P2 Pro तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च झाला होता. त्यातील 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत ₹21,999 होती. त्यामुळे P3 Pro च्या उच्च व्हेरिएंटसाठी किंमत थोडी अधिक असण्याची शक्यता आहे.