iPhone 12 खरेदी करू शकता सर्वात स्वस्त ! जाणून घ्या काय आहेत ऑफर्स…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचा दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale 2021) 27 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू झाला आहे.

फ्लिपकार्ट दिवाळी सेल 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत चालेल. यादरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, गृहोपयोगी वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

iPhone 12 आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीसह सेलमध्ये उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मागील सेलमध्ये iPhone-12 खरेदी करू शकला नसले , तर आता तुम्हाला पुन्हा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

आयफोन 12 किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे?

Flipkart च्या दिवाळी सेलमध्ये Apple चा iPhone 12 फक्त 49,999 रुपयांना उपलब्ध आहे, जो मागील सेलमध्ये 53,999 रुपये मिळत होता.

त्याच वेळी, आयफोन 12 मिनी मागील सेलमध्ये 42,099 रुपयांना उपलब्ध होता. यावर अतिरिक्त सवलत आहे. एवढेच नाही तर तुम्ही तुमचा जुना फोन देखील एक्सचेंज करू शकता.

SBI कार्डांवर 10% सूट

ग्राहकांना SBI कार्ड्सवर जास्तीत जास्त 10 टक्के सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये बहुतांश स्मार्टफोन्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. सेलमध्ये Xiaomi, Apple आणि Realme सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स मिळत आहेत.

Oppo आणि Google फोन वर सवलत

Flipkart दिवाळी सेलमध्ये Oppo Reno 6 5G वर 16 टक्के सूट मिळत आहे. ग्राहक ते 29,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. त्याच वेळी, Google Pixel 4a 31,999 रुपयांऐवजी 29,999 रुपयांना उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe