Poco C71 | पोकोने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Poco C71 लाँच केला आहे. कमी किमतीत उत्तम वैशिष्ट्यांची ऑफर देणाऱ्या या स्मार्टफोनकडे बजेट युजर्सचं लक्ष वेधलं जात आहे.6,499 पासून सुरू होणाऱ्या किमतीत मिळणाऱ्या या फोनमध्ये आधुनिक डिझाइनसोबत दमदार बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि आवश्यक ते सर्व फिचर्स देण्यात आले आहेत.
जाणून घ्या फीचर्स-
Poco C71 मध्ये 6.88 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. यामुळे गेमिंग, व्हिडीओ पाहणं किंवा सोशल मीडिया ब्राउझिंग करताना स्क्रीन स्मूथ वाटते. 600 nits पर्यंतचा पीक ब्राइटनेस असल्यामुळे बाहेरच्या उजेडातही स्क्रीन स्पष्ट दिसते. तसेच या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5mm हेडफोन जॅकदेखील आहे.

या फोनमध्ये UNISOC T7250 हा प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 12nm फॅब्रिकेशनवर आधारित आहे. यासोबत Mali-G57 MP1 GPU दिलं गेलं आहे. यामध्ये 4GB किंवा 6GB LPDDR4X RAM चा पर्याय असून, 64GB किंवा 128GB अंतर्गत स्टोरेज मिळतं. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 2TB पर्यंत वाढवता येतं.
बॅटरी क्षमता व किंमत-
सॉफ्टवेअरबाबत, Poco C71 Android 15 (Go Edition) वर चालतो. या Go Edition सॉफ्टवेअरमुळे कमी RAM असतानाही फोन चांगल्या प्रकारे चालतो. युजर्सना 2 वर्षांसाठी OS अपडेट्स आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्स दिले जाणार आहेत.
या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 5,200mAh आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सहजपणे एक संपूर्ण दिवस चालते. यामध्ये IP52 रेटिंगही मिळते, ज्यामुळे थोड्याफार धुळीपासून आणि पाण्याच्या थेंबांपासून हा फोन सुरक्षित राहतो.
Poco C71 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 आहे, तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 7,499 मध्ये मिळतो. हा फोन पॉवर ब्लॅक, डेझर्ट गोल्ड आणि कूल ब्लू अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. 8 एप्रिलपासून Flipkart वरून याची विक्री सुरू होईल.
बजेट श्रेणीत जबरदस्त डिझाइन, चांगला प्रोसेसर आणि मोठा डिस्प्ले देणारा Poco C71 सॅमसंग Galaxy M05 आणि Infinix Smart 9 HD यांसारख्या फोन्सला टक्कर देण्यास सज्ज आहे.