realme GT 7 सिरीज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता कंपनीने या फोनची लाँच तारीखही सांगितली आहे. realme GT 7 सिरीज 27 मे रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. realme GT 7 प्रो मध्ये सर्वात वेगवान प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 एलिट देणार आहे. हा जीटी फोन पहिला फोन असेल, ज्यामध्ये ग्राफीन कव्हर आइससेन्स डिझाइन असेल.
रिअलमची बाजार स्थिरावला
रिअलमीने भारतीय बाजारपेठेत चांगले मार्केट मिळवले आहे. रिअलमी जीटी ७ मालिका देखील भारतात लाँच केली जाईल. अलीकडेच तो BIS लिस्टिंगमध्ये दिसला, त्यानंतर असे मानले जात आहे की हा फोन जागतिक लाँचिंगसह भारतातही लाँच केला जाऊ शकतो. नवीन Realme मालिकेबद्दल अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये काही स्पेसिफिकेशन्स निश्चितपणे अंदाजित केल्या गेल्या आहेत.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
Realme GT 7 हा पहिला स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये 120 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने सतत 6 तास स्थिर गेमिंग करता येईल. PUBG चे निर्माते क्राफ्टन यांच्या सहकार्याने या उपकरणाची चाचणी देखील घेण्यात आली आहे. त्यात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल. या फोनमध्ये ८ जीबी रॅम असल्याचे म्हटले जात आहे. हे नवीनतम अँड्रॉइड १५ वर चालू शकते. कंपनी या फोनमध्ये अनेक एआय फीचर्स देखील देईल. भारतात नवीन Realme फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच Amazon वरून खरेदी करता येईल.
असेल सगळ्यात तगडी बॅटरी
रियलमीने अलीकडेच एक कॉन्सेप्ट फोन देखील टीझ केला आहे. Realme GT फोनमध्ये १० हजार mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. फोनमध्ये एवढी मोठी बॅटरी बसवण्यासाठी त्याच्या आर्किटेक्चरमध्येही बदल करण्यात आले आहेत. १०,००० एमएएच बॅटरी असलेला फोन हा एक कॉन्सेप्ट फोन असल्याने, तो लाँच होण्याची अपेक्षा नाही.