iQOO चा आगामी स्मार्टफोन ‘iQOO Z10’ येत्या 11 एप्रिल 2025 रोजी भारतात लॉन्च होणार आहे, आणि याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे. हा फोन Z मालिकेतील नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन असून, यात खास करून 7300mAh ची प्रचंड बॅटरी देण्यात येणार आहे.कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील स्मार्टफोनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असेल.
या फोनचा टीझर देखील आला आहे, त्यात ड्युअल रियर कॅमेरा आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) असणार हेही स्पष्ट झालंय. गेल्या वर्षी आलेल्या iQOO Z9 मध्ये 5000mAh बॅटरी होती, तर अलीकडेच लॉन्च झालेल्या व्हिवो T4x मध्ये 6500mAh बॅटरी आहे. त्यामुळे ही बॅटरी क्षमता खरंच एक मोठं अपग्रेड आहे, आणि यामुळे हा फोन बॅटरी लाइफच्या बाबतीत खूपच खास ठरणार आहे.

हा फोन थेट iQOO च्या अधिकृत वेबसाइट iQOO.com आणि Amazon.in वरून उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलंय. डिझाइनबद्दल बोलायचं झालं, तर यात कर्व आणि फिनिश असलेलं बॅक पॅनल असेल. कॅमेरा सेटअपही खास असेल हा लूक तर आकर्षक आहे, पण त्याचबरोबर या फोनमध्ये काय काय खास फीचर्स असतील, याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे.
स्मार्टफोनच्या बाजारात बॅटरी आणि परफॉर्मन्सवर भर देणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. लॉन्चच्या तारखेपर्यंत अजून थोडे दिवस बाकी असल्याने, पुढच्या काळात याबद्दल आणखी माहिती समोर येईल, असं कंपनीने म्हटलंय.
या फोनचं स्पेसिफिकेशनही खूपच दमदार असणार आहे. यात 6.67 इंचाचा क्वाड-कर्व्ह्ड FHD+ AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. म्हणजे गेमिंग आणि स्क्रोलिंगसाठी हा डिस्प्ले एकदम स्मूथ अनुभव देईल.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, जो 8GB किंवा 12GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेजच्या पर्यायांसह येईल.
कॅमेरा डिपार्टमेंटमध्येही हा फोन मागे नाही – यात 50MP चा Sony IMX882 मुख्य कॅमेरा असेल, जो OIS सोबत येईल, आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो चांगल्या फोटोंची हमी देईल.
या फोनची बॅटरी तर आधीच चर्चेत आहे, पण त्यासोबतच यात 90W फास्ट चार्जिंग सपोर्टही असेल, असं सांगितलं जातंय. म्हणजे इतकी मोठी 7300mAh बॅटरी असूनही ती लवकर चार्ज होईल, आणि तुम्हाला जास्त वेळ चार्जरला फोन लावून ठेवावा लागणार नाही.
याशिवाय, फोनची जाडी 8.1mm असेल आणि त्यात आयआर ब्लास्टरसारखी खास सुविधाही मिळेल, ज्यामुळे तुम्ही हा फोन रिमोट म्हणूनही वापरू शकाल.
किंमत किती असेल, याबद्दल अजून पक्कं काही सांगता येत नाही, पण अंदाज आहे की हा फोन 20,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल. लॉन्चच्या आधीच्या काही दिवसांत या फोनबद्दल आणखी माहिती समोर येईल, आणि मग सगळं चित्र स्पष्ट होईल