20 हजार पेक्षाही कमी किंमतीत मिळतील हे 3 वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन्स

20,000 पेक्षाही कमी किमतीत वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, असं समजा. 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स असणाऱ्या काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊयात-

Updated on -

Waterproof 5G Phones : जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल, जो पाण्याखालीही काम करू शकतो आणि तुमचं बजेट 20,000 पेक्षा कमी आहे, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आधी वॉटरप्रूफ फीचर्स फक्त महागड्या फोनमध्ये मिळायचे, पण आता कमी बजेटमध्येही असे जबरदस्त फीचर्स देणारे फोन बाजारात उपलब्ध आहेत. हे 5G स्मार्टफोन केवळ पाण्याचे संरक्षण देत नाहीत, तर त्यांच्यात प्रीमियम फिचर्सही देण्यात आले आहेत.

Realme P3 5G

Realme P3 हा फोन Amazon वर 17,999 मध्ये उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्सनंतर किंमत आणखी कमी होऊ शकते. हा फोन IP69 रेटिंगसह येतो आणि 2.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटं काम करण्यास सक्षम आहे. यामुळे स्विमिंग पूलमध्येही तो आरामात वापरता येतो.

Realme P3 5G
Realme P3 5G

फोनमध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon Gen 4 प्रोसेसर, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 50MP OIS प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

POCO X7 5G

या फोनचे 8+128GB मॉडेल 19,549 ला Amazon वर उपलब्ध आहे. Poco X7 5G मध्येही IP69 रेटिंग आहे आणि तो देखील 2.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे वापरता येतो. फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन (2712×1220 pixels), 120Hz रिफ्रेश रेट आणि Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शन आहे.

POCO X7 5G
POCO X7 5G

यामध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर, 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 20MP सेल्फी कॅमेरा आणि 5,500mAh बॅटरी आहे, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto Edge 50 Fusion

Moto Edge 50 Fusion हा फोन 20,760 मध्ये लिस्ट आहे, पण बँक ऑफर्सनंतर 20,000 च्या खाली मिळू शकतो. याला IP68 रेटिंग आहे, म्हणजे तो 1.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे वापरता येतो. फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट,

Moto Edge 50 Fusion
Moto Edge 50 Fusion

Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शन आहे.यामध्ये 50MP प्रायमरी + 13MP अल्ट्रा वाइड ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe