आयफोनच मार्केट खाणार हा वनप्लसचा फोन; लाँन्चपूर्वीच कंपनीने दाखवला हा भन्नाट लूक

Published on -

मोबाईल मार्केटमध्ये रोज नवनवे माॅडेल दाखल होताहेत. तरीही आयफोन आपली क्रेझ टिकवून आहे. आता याच आयफोनचं मार्केट खाण्यासाठी वनप्लस आपला नवा फोन लाँन्च करण्यास सज्ज आहे. OnePlus ने अधिकृतपणे अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13s ची डिजाइन एका व्हिडीओद्वारे दाखवली आहे. यापूर्वी Amazon आणि कंपनीच्या वेबसाइटवर या फोनच्या बॅक पॅनलची डिजाइन दाखविण्यात आली होती. या व्हिडीओत मात्र फोनचा फ्रंट लुकही समोर आला आहेत.

OnePlus 13s ची वैशिष्ट्ये काय?

OnePlus 13s एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन आहे. पंच-होल कटआउट सह 6.32-इंचाचा डिस्प्ले त्यात असणार आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहेत. डावीकडे कस्टमाइज करण्यासाठी एक नवीन बटन देण्यात आले आहे. जागतिक बाजारात येणारा हा पहिला OnePlus आहे ज्यात Alert Slider नाही.

काय आहे स्पेशल?

OnePlus 13s फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा सेन्सरसह LED फ्लॅश देखील आहे. डिजाईन OnePlus 13T सारखीच आहे. OnePlus 13s पिंक साटन आणि ब्लॅक व्हेल्वेटसह सादर केला जाईल. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट मिळेल. इतर फीचर्सची माहिती मात्र देण्यात आली नाही.

कसा आहे कॅमेरा?

वनप्लस 13s 50 मेगापिक्सलचा मेन वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि ऑटोफोकस फीचरसह तो येईल. त्याचबरोबर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर मिळू शकतो. तो 2x ऑप्टिकल झूम ते 20x डिजिटल झूमला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News