‘हे’ आहेत 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये मिळणारे टॉप 3 स्मार्टफोन !

Published on -

Top 3 Best Smartphone : तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? ते पण पंधरा हजार रुपयांच्या बजेटमध्ये तर आजचा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. कारण की, आज आपण पंधरा हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या टॉप तीन स्मार्टफोन बाबत माहिती पाहणार आहोत.

विशेष म्हणजे आज आपण ज्या स्मार्टफोन बाबत माहिती पाहणार आहोत ते सर्व फाईव्ह जी स्मार्टफोन आहेत. या यादीत सॅमसंग, रिअलमी, विवो या कंपनीच्या स्मार्टफोनचा समावेश होतो. 

15000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 3 स्मार्टफोन 

Realme P3x – हा या यादीतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. रियलमी कंपनीचा हा स्मार्टफोन 5g असून याची किंमत 11 हजार 499 रुपये आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंचाचा डिस्प्ले आहे.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर आहे. याव्यतिरिक्त, या डिव्हाइसला 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. अर्थात या फोनचा बॅटरी बॅकअप हा चांगला आहे.

तुम्हाला जर चांगला बॅटरी बॅकअप असणारा आणि कमी किंमत असणारा फोन घ्यायचा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहू शकतो.

Vivo Y31 – या यादीत Vivo चा फोन येतो. Vivo Y31 हा कंपनीचा वाय सिरीजचा एक लोकप्रिय हँडसेट आहे. याची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.68 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे.

हा फोन 1000 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 6500 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. नक्कीच जर तुमचे बजेट 15000 रुपयांच्या आसपास असेल तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. 

Samsung Galaxy M36 – हा सॅमसंगचा स्मार्टफोन ग्राहकांसाठी फक्त साडेबारा हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे जर तुम्हाला पंधरा हजार रुपयांच्या रेंजमध्ये नवा फोन घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे.

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन 5g असून या डिव्हाइसमध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. याचा डिस्प्ले उत्कृष्ट व्हिज्युअल आणि दैनंदिन वापरासाठी चांगली ब्राइटनेस देतो.

या डिव्हाइसमध्ये Exynos चिपसेट आहे आणि यात 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. नक्कीच ज्यांना सॅमसंगचा 5g स्मार्टफोन घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe