Toyota Innova Electric : 500 किमी रेंजसह टोयोटा इनोव्हा आता इलेक्ट्रिक अवतारात!

Sushant Kulkarni
Published:

टोयोटा इनोव्हा हे नाव भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रतिष्ठेचे आहे. आता, ही आयकॉनिक कार आता इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च होणार आहे. टोयोटा इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो (IIMS) 2025 मध्ये इनोव्हा इलेक्ट्रिकचे पूर्ण विकसित मॉडेल प्रदर्शित करत आहे. यापूर्वी 2022 मध्ये, कंपनीने या वाहनाची संकल्पना सादर केली होती, मात्र यावेळी त्याच्या अंतिम स्वरूपात अधिक प्रगत फीचर्स आणि उत्कृष्ट डिझाइन बघायला मिळत आहे.

नवीन टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिकच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, ते इंडोनेशियातील डिझेल किजांग इनोव्हा मॉडेलच्या लूकवर आधारित आहे. यामध्ये स्पोर्टियर हेडलॅम्प्स, डिआरएल्स (Daytime Running Lights), टॉप माउंटेड एलईडी स्ट्रिप, आणि ईव्ही-विशिष्ट बंद ग्रिल देण्यात आली आहे.

ही BEV (Battery Electric Vehicle) इनोव्हा 16-इंच अलॉय व्हील्स वर आहे, जी पारंपरिक डोअर हँडल्स, ड्युअल-टोन ओआरव्हीएम (ORVMs) समर्पित टर्न सिग्नलसह सुसज्ज आहे. मागील बाजूस, गाडीला रॅप-अराउंड टेल लॅम्प्स आणि BEV बॅजिंग मिळेल, जे तिच्या इलेक्ट्रिक ओळखीला अधोरेखित करतात.

नवीन इनोव्हा इलेक्ट्रिकमध्ये प्रशस्त आणि लक्झरीयस इंटीरियर देण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवास आणखी आरामदायक होईल. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 10-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जर, ड्युअल-टोन इंटीरियर थीम, कॅप्टन सीट्स, आणि रीअर सीट एंटरटेनमेंट स्क्रीन यांसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे वाहन केवळ एक एसयूव्ही नसून, एक लक्झरीयस 7 सीटर कार बनली आहे.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिकमध्ये 59.3 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही मोटर 179 bhp पॉवर आणि 700 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. टोयोटाने अद्याप कारची ड्रायव्हिंग रेंज जाहीर केलेली नाही, मात्र 450 ते 500 किमीच्या श्रेणीची अपेक्षा केली जात आहे. यामुळे, ही एसयूव्ही लांब प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

सध्या, ही इलेक्ट्रिक इनोव्हा प्रथम इंडोनेशियन बाजारात सादर केली जाईल. भारतात याचे लॉन्च होण्याची शक्यता आहे मात्र याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारतामध्ये टोयोटा पेट्रोल आणि हायब्रिड प्रकारात इनोव्हा हायक्रॉस आणि डिझेल वर्जनमध्ये इनोव्हा क्रिस्टा उपलब्ध करत राहील.टोयोटाने BEV इनोव्हा सादर करून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठे पाऊल उचलले आहे. ही गाडी प्रगत वैशिष्ट्ये, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससह बाजारात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe