Unknown Number : आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; भारत सरकारची नवीन योजना

Ahmednagarlive24 office
Published:
Unknown Number

Unknown Number : जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला तर सर्वात आधी तुम्ही विचार कराल की हा कॉल कोणाचा असेल. काही लोकांकडे truecaller सारखे अॅप असतात ज्यात ते कॉलरचे नाव पाहू शकता आणि अनेकांना इच्छा नसतानाही कॉल रिसिव्ह करावा लागतो. पण आता येत्या काही दिवसांत असे होऊ शकते की, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरसोबत त्या व्यक्तीचे नावही दिसेल. हे TRAI कॉलर आयडी प्रणाली अंतर्गत असेल जे पूर्णपणे KYC आधारित असेल. TRAI कॉलर आयडी प्रणाली हा भारत सरकारचा एक नवीन उपक्रम आहे, जो सध्या चर्चेत आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्व मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याची योजना आखली आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे केवळ कॉलरचा मोबाइल नंबरच नाही तर नंबरसोबत कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव देखील असेल. त्याच्या आधार कार्डमध्ये जे नाव लिहिलेले असेल तेच नाव समोरच्या व्यक्तीला दिसेल.

trai caller id system details in hindi

जेव्हा कोणी ट्रायच्या कॉलर आयडी सिस्टममध्ये कॉल करतो तेव्हा त्याचा नंबर आणि नाव दोन्ही स्क्रीनवर दिसतील. अशा परिस्थितीत, लोकांना कॉल घेण्यापूर्वीच कॉलरचे नाव कळेल. हा नियम लागू झाल्यानंतर, कॉलर आपली ओळख लपवू शकणार नाही आणि खोटे बोलणे किंवा फसवणूक होण्याच्या परिस्थितीत घट होईल. भारत सरकारच्या या नियमानंतर Truecaller सारख्या थर्ड पार्टी अॅप्सची गरज भासणार नाही.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण येत्या तीन आठवड्यांत आपली नवीन योजना जाहीर करू शकते. अहवालानुसार, ही पूर्णपणे केवायसी आधारित प्रक्रिया असेल. ज्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड जारी करण्यात आले आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरून कॉल केल्यावर तेच नाव समोरच्या व्यक्तीच्या फोनवर दिसेल.

how to add number to emergency contact list use emergency call

भारत सरकारची योजना

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण पुढील तीन आठवड्यांत आपली नवीन योजना जाहीर करू शकते. अहवालानुसार, पूर्णपणे केवायसी आधारित प्रक्रिया अवलंबली जाईल. ज्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड देण्यात आले आहे, त्या मोबाईल क्रमांकावरून कॉल केल्यानंतर तेच नाव समोरच्या व्यक्तीच्या फोनमध्ये दिसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe