OnePlus Nord : वनप्लसच्या ‘या’ ट्रिपल कॅमेरा फोनवर 30 टक्के पर्यंत सूट, याठिकाणी सुरु आहे ऑफर…

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus Nord

OnePlus Nord : स्वस्त किमतीत नवीन 5G फोन खरेदी करण्याच्या विचार असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे, सध्या Amazon वर सुरु असलेल्या सेलमध्ये वनप्लसचा जबरदस्त फोन स्वस्त किंमतीत मिळत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला फोन किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे, पाहूया…

आम्ही सध्या OnePlus Nord CE 3 5G फोनबद्दल बोलत आहोत. हा फोन Amazonवर डिस्काऊंडसह ऑफर केला जात आहे. या फोनवर तुम्ही बँक ऑफर आणि कॅशबॅक देखील मिळवू शकता. चला, या फोनवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus Nord CE 3 5G फोनची वैशिष्ट्ये :-

-OnePlus चा हा फोन 6.7-इंचाच्या FHD AMOLED डिस्प्लेसह येतो.

-हा फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे.

-यासह, यात 950 nits ची शिखर ब्राइटनेस आहे.

-कामगिरीच्या बाबतीत, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 782G चिपसेट आहे.

-कॅमेरा फीचरबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो 50MP OIS कॅमेरा सह येतो. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आणि तिसरा २ मेगापिक्सल्सचा मॅक्रो कॅमेरा आहे.

-एवढेच नाही तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

-पॉवरसाठी, या डिव्हाइसमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे.

ऑफर

त्याच्या किंमती आणि ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 128GB वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. जे Amazon वर 30 टक्केच्या सवलतीनंतर 18,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहे. यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 17650 रुपयांची सूट दिली जात आहे.

बँक ऑफरद्वारे, तुम्हाला कॅनरा बँक कार्डवर 500 रुपये सूट मिळत आहे. एवढेच नाही तर तुम्ही ते EMI पर्यायावरही खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe