Oneplus चा नवा धमाका! 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह येणार वनप्लसचा नवा फोन

वनप्लस 2025 मध्ये स्मार्टफोन लाइनअपमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या वर्षी कंपनी अनेक नवे डिव्हाइसेस सादर करणार असून त्यात डिझाइनमध्ये बदल आणि प्रीमियम फीचर्सचा समावेश असेल. अलीकडेच वनप्लसने चीनमध्ये OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Upcoming Oneplus Smartphone:- वनप्लस 2025 मध्ये स्मार्टफोन लाइनअपमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या वर्षी कंपनी अनेक नवे डिव्हाइसेस सादर करणार असून त्यात डिझाइनमध्ये बदल आणि प्रीमियम फीचर्सचा समावेश असेल. अलीकडेच वनप्लसने चीनमध्ये OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

जे अनुक्रमे क्वालकॉमच्या Snapdragon 8 Gen 3 आणि 8 Elite प्रोसेसरसह सादर करण्यात आले. त्याचबरोबर OnePlus Ace 5 चे OnePlus 13R या नावाने जागतिक बाजारात रिब्रँडेड व्हर्जन देखील सादर करण्यात आले आहे.

वनप्लस 2025 मध्ये आणणार नवीन डिझाइन

एक प्रसिद्ध चीनी टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने वनप्लसच्या आगामी स्मार्टफोन्सबाबत काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. 2025 मध्ये वनप्लस संपूर्णपणे नवीन डिझाइन भाषेसह स्मार्टफोन्स सादर करण्याच्या तयारीत आहे.

याचा अर्थ असा की,कंपनी त्यांच्या विद्यमान मॉडेल्सच्या तुलनेत अधिक प्रीमियम आणि इनोव्हेटिव्ह लुक असलेल्या फोनवर काम करत आहे. यामध्ये पुढील काही प्रमुख स्मार्टफोन्स लाँच होण्याची शक्यता आहे:

आगामी काळात येणारे वनप्लसचे स्मार्टफोन

वनप्लस 13टी किंवा वनप्लस 13 मिनी

2025 मध्ये लाँच होणाऱ्या वनप्लस स्मार्टफोन्समध्ये OnePlus 13T (किंवा OnePlus 13 Mini) चा समावेश असणार आहे. काही अहवालांनुसार, या फोनमध्ये 6.31-इंचाचा OLED डिस्प्ले असेल आणि हा सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो.

हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येईल आणि त्यामध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप, वायरलेस चार्जिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, मेटल फ्रेम आणि ग्लास बॅक यांसारखी प्रीमियम फीचर्स असतील.

वनप्लस Ace 5s आणि OnePlus Ace 5V

OnePlus Ace 5 सिरीजमध्ये Ace 5s आणि Ace 5V हे दोन नवीन स्मार्टफोन 2025 मध्ये लाँच केले जातील. या दोन्ही डिव्हाइसेसना फ्लॅट डिस्प्ले दिला जाईल. तर Ace 5V हा आकाराने मोठा असणार आहे.

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये MediaTek चा नवीनतम प्रोसेसर देण्यात येईल. विशेष म्हणजे 7000mAh ची प्रचंड बॅटरी देण्यात येणार असल्यामुळे दीर्घकाळ बॅटरी बॅकअप मिळण्याची शक्यता आहे.

वनप्लस १४ फ्लॅगशिप स्मार्टफोन

वनप्लसचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 14 ऑक्टोबर 2025 मध्ये लाँच होईल. हा फोन Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसरवर चालेल आणि त्यामध्ये फ्लॅट डिस्प्ले दिला जाईल. वनप्लसच्या फ्लॅगशिप मॉडेल्सना नेहमीच उत्कृष्ट कॅमेरा आणि परफॉर्मन्स मिळतो.त्यामुळे OnePlus 14 देखील तगड्या फीचर्ससह सादर केला जाईल.

वनप्लस Ace 6 सिरीज

नोव्हेंबर 2025 मध्ये OnePlus Ace 6 सिरीज लाँच केली जाईल. या मालिकेतील दोन प्रमुख स्मार्टफोन्स OnePlus Ace 6 आणि OnePlus Ace 6 Pro असतील. जरी याबाबत फारशी माहिती समोर आलेली नसली तरी अंदाजानुसार Ace 6 मध्ये Snapdragon 8 Elite, तर Ace 6 Pro मध्ये Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.

वनप्लस युजर्ससाठी मोठी संधी

वनप्लसने आतापर्यंतच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी नेहमीच उच्च दर्जाच्या इनोव्हेशनवर भर दिला आहे. डिझाइन, कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स यामध्ये सातत्याने सुधारणा करत वनप्लसने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2025 मध्ये वनप्लस अनेक महत्त्वाचे बदल करत असून त्यांच्या स्मार्टफोन्समध्ये अधिक आकर्षक डिझाइन, प्रीमियम मटेरियल आणि दमदार फीचर्स दिले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe